गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमध्ये शास्त्र शाखेत अर्चित रोहिडा प्रथम, शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के
कोल्हापूर : येथील गोपाळकृष्ण गोखले कॉलेज १२ वी शास्त्र शाखेचा निकाल १०० टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९१.१७ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ६०.१२ टक्के तर एचएसव्हीसी बँकिंगचा निकाल ९८.१८ टक्के लागला आहे
शास्त्र शाखेत अर्चित रोहिडा याने ९५.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात पहिला क्रमांक पटकावला, तर युगंधरा मोहिते ८९ टक्के आणि मीत भाटेजा ८८.८३ टक्के यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेत स्वप्निल पाथरे ६६.६७ टक्के, सोहम जमादार ६४ टक्के, यश चंदनशिवे ६०.१७ टक्के यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.
कला शाखेत प्रतीक्षा हरी साळुंखे ६३.६७ टक्के, सीमा चंदनशिवे ६१.३३ टक्के, तनिष्क दुर्गुळे ६० टक्के यांनी तर एचएसव्हीसी बँकिंगमध्ये प्रीती जयस्वाल ७२.६७ टक्के, मृणाली सुतार ६८ टक्के, संजीवनी मनूरकर ६५.८३ टक्के यांनी पहिले तीन क्रमांक पटकावित नेत्रदीपक यश मिळविले.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव जयकुमार देसाई अध्यक्ष डॉक्टर मंजिरी मोरे देसाई पेट्रन कौन्सिल दौलत देसाई प्राचार्य रंगराव भुयेकर यांचे मार्गदर्शन लाभले