- *उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट*
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळात वेळ काढून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी पवार यांनी महाडिक यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाडिक परिवाराच्या वतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते नामदार अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वरूप महाडिक, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्ले, कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, मकरंद बोराडे, शिरोली ग्रामपंचायत सरपंच पद्मजा करपे यांच्यासह शिरोली ग्रामपंचायत सदस्य आणि महाडिक परिवारातील सदस्य उपस्थित होते.
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घरी दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.