केआयटीतर्फे रविवारी होणार अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे रविवारी (दि. ८) प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे मोफत मार्गदर्शन विद्यार्थी, पालकांसाठी आयोजित केले आहे. सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
वनरोट्टी आणि चौगुले म्हणाले, केआयटी ४२ वर्षे दर्जात्मक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणारे महाविद्यालय आहे. एन.बी.ए. नॅक यासह ‘एम्पॉवर्ड ऑटोनॉमी’ चा दर्जा प्राप्त असलेले शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील कॉलेज आहे. रविवारी अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर च्या संधी आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२५’ या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलेजाणार आहे.
अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही थोडी गुंतागुंतीची आहेत. त्यातील असणाऱ्या एकूण टप्प्यांवरती एखादी झालेली छोटी चूक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान ठरू शकते. याचे गांभीर्य ओळखूनच कैआयटीतर्फे मार्गदर्शन होत आहे. अभियांत्रिकीच्या विविध विभागातील करिअरच्या संधी, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील टप्पे, महत्त्वाची कागदपत्रे, शिष्यवृत्ती, आरक्षण, शासकीय नियम, विद्यार्थिनींसाठी शासकीय सवलती आदीबाबत मार्गदर्शन केले जाईल.
केआयटी चे बदलते स्वरूप, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले विविध प्रयत्न, नवीन शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अभ्यासक्रमांत सुरू असलेले आमूलाग्र बदलाची माहितीही वनरोट्टी यांनी दिली. प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. महेश शिंदे यांनी प्रवेश प्रक्रियेची माहिती सांगितली. प्रा. अमित वैद्य यावेळी उपस्थित होते.
			        



