भैरोबा माळावर वृक्ष लागवड मोहीम – पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल!

Spread the news

भैरोबा माळावर वृक्ष लागवड मोहीम – पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल!
भुये, ता. १३ जून:
गेल्या दहा वर्षांपासून भैरोबा माळावर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची परंपरा अखंडपणे सुरू ठेवणाऱ्या भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समिती, भुये व भुयेवाडी यांच्या पुढाकाराने यावर्षीही वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मोहीम येत्या रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत भैरोबा माळावर राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी एक फळझाड किंवा देशी झाड आणण्याचे, तसेच खोरे, टिकाव, कोयता, पाटी, बादली यांसारखे लागणारे साहित्य घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
वृक्ष लागवड ही केवळ एक सामाजिक कर्तव्य नसून ती आपली नैतिक जबाबदारी आहे, असे मत समितीचे कार्यकर्ते अमर पाटील (नाना) आणि दिपक पाटील यांनी व्यक्त केले.
“प्रत्येक झाड भविष्यातील पर्यावरणाचा आधारस्तंभ ठरतो. त्यामुळे या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती,” असे आवाहनही त्यांनी केले.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!