Spread the news

*हद्दवाढीच्या प्रस्तावात नवी उजळाईवाडीचा समावेश, पिरवाडीचा चुकून उल्लेख; सुधारित पत्र आयुक्तांना देणार : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती*

 

 

 

  •  

कोल्हापूर दि.२२ : काल झालेल्या हद्दवाढीच्या पत्रकार परिषदेत पिरवाडी या गावाच्या नावाचा चुकून उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी या गावांसह आठवे गांव म्हणून नवी उजळाईवाडी या गावाचा समावेश करण्याचे ठरले होते. याबाबत तात्काळ कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात सुधारणा करून नवी उजळाईवाडी या गावाचा हद्दवाढीत समावेश करणेबाबत सुधारित पत्र उद्या (दि.२३) सोमवार रोजी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!