- जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरा, निवडणुकीत यश मिळेल
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळायचे असेल तर जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरा असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा आज कोल्हापुरात झाला. या मेळाव्याला माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. माजी मंत्री पाटील म्हणाले शरद पवार यांच्या विचाराने आगामी काळात कार्यकर्त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवावी. निवडणूक अतिशय महत्त्वाचे आहे. कोल्हापुरात आपली ताकद आहे. ही ताकद निवडणुकीत वापरून अधिकाधिक जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत.
माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार दिले जाणार आहेत. आज सत्ता नाही पण अशी ताकद निर्माण करा की राष्ट्रवादी शिवाय महाराष्ट्रात सत्ताच येऊ शकणार नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील शहराध्यक्ष आर. के. पोवार, शाहू समूहाचे अध्यक्ष समरजीत घाटगे, माजी आमदार राजीव आवळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यास अनिल घाटगे, आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई, शिवानंद माळी, पद्मजा तिवले, उदयसिंह पाटील, रामराजे कुपेकर सुनील देसाई, विनय कदम अश्विनी माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.