महापालिकेत मोठा खांदेपालट
रमेश मस्कर शहर अभियंता
कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेत आयुक्तांनी बुधवारी मोठा खांदेपालट केला. उपशहर अभियंता आणि गेले काही दिवस जल अभियंता म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्या रमेश मस्कर यांना शहर अभियंता म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर सध्या शहर अभियंता असलेले हर्षजीत घाटगे यांना पुन्हा एकदा जल अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल यापूर्वी शहर अभियंता असलेले नेत्रदीप सरनोबत यांना जल अभियंता म्हणून नियुक्ती केली होती. तेव्हा घाटगे यांना शहर अभियंता म्हणून नियुक्ती केली होती. सरनोबत निवृत्त झाल्यानंतर घाटगे यांना शहर अभियंता म्हणून पदभार देण्यात आला. याचवेळी रमेश मस्कर यांना जल अभियंता हे पद देण्यात आले. पण महिन्याभरातच पुन्हा एकदा खांदेपालट करण्यात आले आहे. आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी याबाबत बुधवारी मोठा निर्णय घेतला. मस्कर यांना शहर अभियंता तर घाटगे यांना जल अभियंता करण्यात आले आहे. यामुळे महापालिकेत उलट सुलट चर्चेला मोठा वेग आला आहे.