पाचवी शिष्यवृत्ती, आठवी एनएमएमएस परीक्षेसंबंधी शिक्षकांसाठी कार्यशाळा
कोल्हापूर : शिक्षकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या दर्पण फाऊंडेशन शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहे.
फाऊंडेशनतर्फे १४ व १५ जुलै २०२५ या कालावधीत इयत्ता पाचवी शिष्यवृती व आठवी एनएमएमएस परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या
शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा प रिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत शिक्षकांनी
मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. कोल्हापूर शहर व परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि आठवी एनएमएमएसच्या वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे.
कार्यशाळेत इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसंबंधी तज्ज्ञ शिक्षक संदीप वाली, दिगंबर वाईंगडे, साताप्पा शेरवाडे, नामदेव निकम हे मार्गदर्शन
करणार आहेत.आठवी एनएमएसएमसंबंधी निवृत्त अध्यापक ए. आर. पाटील, विद्यामंदिर गवसे येथील विलास पाटील, राधानगरी
विद्यालयातील दीपक पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधी आयोजित शिक्षकांसाठीची ही कार्यशाळा पद्मभूषण वि. स. खांडेकर प्राथमिक विद्यालय प्रतिभानगर येथे
होणार आहे. आठवी एनएमएमएस विषयक शिक्षकांसाठी कार्यशाळा दादासाहेब मगदूम हायस्कूल, महावीर कॉलेज येथे होणार आहे. या
कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी कुमार पाटील 9096413499,
राम भोळे 77097 44027, संजय कडगावे 9850045019, सचिन यादव, 7741973636, अरुण गोते 9975440452, युवराज सरनाईक
9881912765, श्रीपाद रामदासी 9923757373, संजय पाटील 9404423130, महादेव डावरे 9923903536 यांच्याशी संपर्क साधावा असे
आवाहन संयोजकांनी केले आहे.