*डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्नीकला*
*टॉप मेरीटच्या विद्यार्थ्यांची पसंती*
कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलीटेक्नीकला टॉप मेरीटच्या विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. यंदा 96.20 टक्के गुण मिळविलेल्या सत्यम बाजीराव गायकवाड या विद्यार्थ्याने मेकॅनिकल शाखेला प्रवेश घेतला आहे. शताक्षी इंद्रजीत शिंदे या 95.80 टक्के ग्रुप मिळविलेल्या विद्यार्थीनीने कॉम्प्युटर सायन्स शाखेला तर 94.40 टक्के गुण मिळवलेल्या आयुष सचिन चाळकेने कॉम्प्युटर इंजिनिअरींग तसेच 89.80 टक्के गुण प्राप्त ऋचा महादेव साठे हिने सिव्हील इंजिनिअरींग शाखेला प्रवेश घेतला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पॉलिटेक्निकचा शैक्षणिक दर्जा, विद्यार्थी केंद्रित नवनवीन उपक्रम, विविध क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन यामुळे पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे प्राचार्य डॉ.नरके यांनी सांगितले.
या वेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभागप्रमुख डॉ.पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शितल साळोखे सुविधा केंद्र प्रमुख प्रा.अर्चना जोशी, प्रवेश प्रक्रिया सह समन्वयक प्रा. राज आलासकर तसेच पालक उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के.गुप्ता यांनी अभिनंदन केले.
*फोटो ओळी* : डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके,सर्व विभागप्रमुख, पालक आणि विद्यार्थी