गोकुळ दूध संघाच्या अनुदान योजनेत मोठी वाढ शेतकऱ्यांना दिलासा, उत्पादन वाढीस गती
दुग्ध उत्पादन वाढीसाठी गोकुळच्या सुधारित योजना नक्कीच लाभदायी ठरतील….
– नविद मुश्रीफ
चेअरमन, गोकुळ दूध संघ
कोल्हापूर ता.२५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्याचा संचालक मंडळाने संकल्प केला असून तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने संघामार्फत विविध योजना राबवून दूध वाढ कृती कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी दूध उत्पादकांना तसेच तरुण वर्गांला या दुग्ध व्यवसायाकडे वळविणेसाठी संघामार्फत विविध योजनेअंतर्गत दूध उत्पादक व दूध संस्थांना अनुदान देण्यात येतात. दि.२३/०७/२०२५ इ.रोजीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये काही अनुदान योजनेमध्ये बदल करणेचे धोरण ठरवण्यात आले असून दूध उत्पादकांची मागणी, काही सूचना लक्षात घेता काही योजनेतबदल करून सुधारित योजना राबविण्यात येणार आहेत. संघामार्फत दिले जाणारे जातिवंत म्हैस खरेदी अनुदान, वासरू संगोपन अनुदान, सचिव कमिशन रक्कमेमध्ये वाढ केली आहे. तसेच फर्टीमिन प्लस सवलतीच्या दरात या सर्व योजनामध्ये नवीन सुधारणा केल्या असून या सुधारित योजना दूध उत्पादन वाढीसाठी नक्कीच लाभदायी ठरतील.तसेच या सुधारित योजनेच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा व दूध उत्पादन वाढीस गती मिळणार आहे.
जातिवंत म्हैस खरेदी अनुदानात ऐतिहासिक वाढ
संघामार्फत परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदीसाठी मिळणाऱ्या अनुदानात दि.०१ जुलै २०२५ पासून मोठी वाढ करण्यात आली आहे.
मुऱ्हा म्हैशीसाठी असणाऱ्या अनुदानाची रक्कम रु. ४० हजार ऐवजी रु.५० हजार इतकी केली असून त्यात रु.१० हजार वाहतूक भाडे, रु.१५ हजार खरेदी केलेली म्हैस शेतकऱ्यांच्या गोठ्यात व्याल्यानंतर आणि उर्वरित रु.२५ हजार तीन वर्षांनंतर अदा केली जाणार आहे.
मेहसाणा व जाफराबादी म्हैशीसाठी असणाऱ्या अनुदानाची रक्कम रु. ३५ हजार ऐवजी अनुदान आता रु.४५ हजार असून त्यातही तशीच रक्कम विभागणी ठेवण्यात आली आहे.
संघाच्या केर्ली ता. करवीर येथील म्हैस खरेदी डेपोतून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही अनुदानाची रक्कम रु. ३० हजार ऐवजी रु.४० हजार इतकी केली असून त्यात रु.५ हजार वाहतूक भाडे, रु.१५ हजार खरेदी केलेली म्हैस शेतकऱ्याच्या गोठ्यात व्याल्यानंतर आणि उर्वरित रु.२० हजार तीन वर्षांनंतर अदा केली जाणार आहे.
जातिवंत म्हैस खरेदी सुधारित अनुदान योजना –
म्हैस जात
सध्याचे अनुदान
नवीन अनुदान
मुऱ्हा
सध्याचे अनुदान ४०,०००
वाहतूक खर्च रोख रक्कम ५,०००
तीन वर्षानंतर रोख रक्कम ३५,०००
नवीन अनुदान ५०,०००
वाहतूक खर्च रोख रक्कम १०,०००
खरेदी म्हैस शेतकऱ्याच्या
गोठ्यात व्याल्यानंतर १५,०००
तीन वर्षानंतर रोख रक्कम २५,०००
मेहसाना जाफराबादी
सध्याचे अनुदान ३५,०००
वाहतूक खर्च रोख रक्कम ५,००० तीन वर्षानंतर रोख रक्कम ३०,०००
नवीन अनुदान ४५,०००
वाहतूक खर्च रोख रक्कम १०,०००
खरेदी म्हैस शेतकऱ्याच्या
गोठ्यात व्याल्यानंतर १५,०००
तीन वर्षानंतर रोख रक्कम २०,०००
म्हैस खरेदी डेपो, केर्ली मुऱ्हा
सध्याचे अनुदान ३०,०००
वाहतूक खर्च रोख रक्कम ५,०००
तीन वर्षानंतर रोख रक्कम २५,०००
नवीन अनुदान ४०,०००
वाहतूक खर्च रोख रक्कम ५,०००
खरेदी म्हैस शेतकऱ्याच्या
गोठ्यात व्याल्यानंतर १५,०००
तीन वर्षानंतर रोख रक्कम २०,०००
म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी (गावठी व सुधारित म्हैशीकरिता) रेडी वासरू संगोपन अनुदानात वाढ.
रेडी वासरू संगोपन योजनेमध्ये फक्त पहिल्या वेतासाठी (गावठी व सुधारित म्हैशीकरिता) ४० महिन्याच्या आत गाभण गेल्यास रु.७ हजार अनुदान दिले जात होते. त्यामध्ये २ हजार वाढ करून रू.९ हजार इतके अनुदान करण्यात आले आहे.
फर्टीमिन प्लस – आरोग्य सुधारणा आणि उत्पादन वाढ
मिनरल मिक्श्चरचा वापर नियमित व्हावा याकरीता संघामार्फत दि.०१.०२.२०२५ ते दि.३१.०३.२०२५ या कालावधी रू.७.५० कोटी फर्टीमिन प्लस दूध उत्पादकांना मोफत दिले. फर्टीमिन प्लसचा वापर केलेमुळे दूध उत्पादकांच्या गायी म्हैशींच्या दूधामध्ये, गुणवत्तेमध्ये, फॅट व एस एन एफ मध्ये वाढ झाली. संघाचे दुय्यम प्रतीचे प्रमाण कमी झाले संघाचे कृत्रिम गर्भधारणा संख्येत लक्षणीय वाढ होवून गाभण प्रमाण वाढत आहे.याच्या विचार करिता
फर्टीमिन प्लसचा वापर केलेने दूध उत्पादकांना फायदा झालेने संघाने दि.०१.०४.२०२५ पासून महालक्ष्मी गोल्ड व कोहिनूर डायमंड सोबत फटीमिन प्लस सवलतीच्या दरात (रू. १५० मुळ किंमत वजा रू.५० सुट देऊन रू. १००/-) देणेचा निर्णय घेतला. याचा जास्तीत जास्त वापर व्हावा व प्रत्येक दूध उत्पादकांने फर्टीमिन प्लस वापरावे यासाठी फर्टीमिन प्लस दरात ५० टक्के म्हणजे रू. १५०/- चा पुडा रू.७५/- ला करणेचा निर्णय दि.२३.०७.२०२५ चे संचालक मंडळ सभेत झाला. ही योजना ३ महिन्यांसाठी म्हणजे दि.०१.०८.२०२५ ते दि.३१.१०.२०२५ या कालावधीसाठी राहणार आहे. यासाठी संघावर अतिरिक्त बोजा रू.१.८० कोटी इतका पडणार आहे.
महालक्ष्मी गोल्ड ५० किलो रू. १२५०
फर्टीमिन प्लस १ किलो (रू. १५० मुळ किंमत)
महालक्ष्मी गोल्ड ५० किलो अधिक फर्टीमिन प्लस १ किलो रू. १४००
वजा रु.७५ सुट
एकूण किंमत १३२५/-
महालक्ष्मी कोहिनूर डायमंड ५० किलो रू. १६५०
फर्टीमिन प्लस १ किलो (रू. १५० मुळ किंमत)
महालक्ष्मी कोहिनूर डायमंड ५० किलो अधिक फर्टीमिन प्लस १ किलो रू. १८००
वजा रु.७५ सुट
एकूण किंमत १७२५/-
सचिव कमिशनमध्ये वाढ (कालावधी ऑगस्ट-ऑक्टोबर २०२५)
गोकुळने प्रत्येक दूध संस्थेतील सचिवांच्या कष्टाला मान्यता देत कमिशन वाढवले आहे.
उत्पादनाचा प्रकार
पशुखाद्य उत्पादने (पोती)
सध्याचे कमिशन (रु. प्रतिपोते)
एकूण कमिशन (रु. प्रतिपोते)
महालक्ष्मी गोल्ड ५१ किलो (रू.१,६२५/-) कोहिनूर डायमंड ५० किलो (रु.१,७२५/-)
१ ते २० पोत्यांपर्यंत प्रति महिना
६.००
१०.००
२१ ते ४० पोत्यांपर्यंत प्रति महिना
८.००
१४.००
४१ व त्यावरील पोती प्रति महिना
१०.००
१८.००
यासाठी संघावर अंदाजे अतिरिक्त बोजा रु.६० लाख इतका पडणार आहे. यामुळे सचिवांमध्ये योजना पोहोचवण्याची प्रेरणा वाढणार आहे.
गोकुळने नेहमीच शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. म्हैस खरेदी अनुदानात वाढ, संगोपन योजना, आरोग्यदायी फर्टीमिन सवलत व सचिवांसाठी प्रोत्साहनात्मक धोरणे राबवली गेली आहेत. गोकुळ संघ दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नवीन योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा, तसेच तरुणांनी या दुग्ध व्यवसायाकडे वळावे हीच आमची अपेक्षा आहे.
संघाने विविध उपक्रम –
१. स्लरी प्रक्रिया प्रकल्प उत्पादनाची – जवळजवळ १७ ते १८ लाख विक्री
२. सौर उर्जा प्रकल्प, करमाळा – ७ ते ८ कोटीची बचत
३. हर्बल पशुपूरक प्रकल्प (आयुर्वेदिक उपचार) दूध उत्पादकांच्या ५२ हजार जनावरांच्या विविध सुप्त मस्टायटिस, मस्टायटिस, पान्हा न घालणे, अपचन अतिसार, सर्व प्रकारचा ताप या उद्भवणाऱ्या आजारांवर रू. २५ लाख किंमतीची औषधे वापर
या विविध विषयांनावर चर्चा करण्यात आली.