स्वप्न मोठी ठेवा: विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

Spread the news

स्वप्न मोठी ठेवा: विनायक भोसले

 

  •  

 

 

  1. घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

अतिग्रे : स्वप्न मोठी ठेवा, मेहनत करत रहा, ध्येय निश्चित ठेवा आणि सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न करत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत विद्यापीठात आयोजित प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात दिला.

घोडावत विद्यापीठात यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत इंडक्शन प्रोग्रॅमच्या माध्यमातून करण्यात आले.
या मध्ये इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, सायन्स, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, फार्मसी आणि कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स या विभागांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

या प्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणाची ओळख करून दिली. उच्च दर्जाच्या शिक्षणपद्धती, जागतिक स्तरावरील संशोधन संधी आणि विद्यार्थी विकास कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.

कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यापीठातील शिस्तपालनाचे नियम, प्रशासन प्रक्रियेची पारदर्शकता व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधेबद्दल माहिती दिली.

यावेळी विद्यापीठातील सर्व डीन, विभागप्रमुख आणि प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!