डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे* *रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षेत यश*

Spread the news

*डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे*
*रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षेत यश*

कोल्हापूर
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई (BARC) द्वारा घेतल्या जाणाऱ्या रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर (आरएसओ) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ममता बांगरे आणि धीरज बागल हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे विद्यार्थी ममता बांगरे आणि धीरज बागल यानी अधिष्ठाता आणि संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करून हे यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्रात भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई व डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर या दोनच ठिकाणी हा अॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरु आहे.

  •  

रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रेडीएशन थेरपी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मेडिकल फिजीशिएस्ट व रेडीएशन सेफ्टी ऑफिसर आदी पदावर नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी ममता व चेतन यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!