हिंद- दि-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

Spread the news

हिंद- दि-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

­

 

– आमदार अमल महाडिक

  •  

कोल्हापूर दिनांक 23 : महाराष्ट्र शासनातर्फे हिंद- दि- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचे आयोजन 28 फेब्रुवारी व 1 मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर येथे करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केले आहे.

350 व्या शहीदी समागमानिमित्त कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी व सर्वसामान्यांसाठी निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धकांनी 25 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठवावयाच्या आहेत. या निबंध व घोषवाक्य स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन आमदार श्री महाडिक त्यांनी केले आहे.

श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी प्राण दिले. धर्मांतर सक्तीला शरण न जाता त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. त्यांच्या शौर्याचे, बलिदानाचे व देशाबद्दलचे मानवतावादी कार्य लक्षात घेऊन तसेच त्यांच्या पराक्रमाची व्यापक माहिती इतर समाजाला व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातर्फे अनेक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विभागीय माहिती कार्यालयातर्फे, ” श्री गुरु तेग बहाद्दूर – यांचे जीवन कार्य ” या विषयावर सुमारे 500 ते 600 शब्दात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्याच्या अनुषंगाने आकर्षक घोषवाक्य स्पर्धेचेही विविध गटात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपला निबंध तसेच घोषवाक्य आपल्या नाव पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह [email protected] या ई-मेल वर 25 फेब्रुवारीपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. या स्पर्धेमध्ये तसेच मुंबई येथील कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!