अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही आमच्या नेत्यांसोबत
बावड्याच्या हनुमान मंदिरात यावयास तयार
प्रा. जयंत पाटील यांचे सतेज पाटील यांना आवाहन
कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोणतीही चर्चा न होता प्रस्ताव मंजूर करावा लागत्यामुळे तत्कालिन सभापती सचिन चव्हाण व सदस्य प्रचंड अस्वस्थ होते, याचीही आम्हाला जाणीव आहे. पण नेत्याच्या संरक्षणासाठी नगरसेवकांना दाणीला देणे योग्य नाही, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांनी आमचे आव्हान स्विकारावे आणि चर्चेला यावे. त्यासाठी त्यांना जर अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही आमच्या नेत्यांसोबत बावड्याच्या हनुमान मंदिरात यावयास तयार आहोत असे आवाहन माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी केले आहे.
प्रा. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण हे स्थायी समिती सभापती असताना थेट पाईपलाईन योजनेला मंजूरी दिली गेली. त्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये या योजनेचा प्रस्ताव कोणतीही महत्वपूर्ण आणि तांत्रिक चर्चा न करता केवळ ३ मिनिटात मंजूर करण्यात आला. त्यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांची घालमेल मी प्रत्यक्ष पाहिली आहे. त्यामुळे आमचा नगरसेवकांवर कोणताही आक्षेप नाही. माझा वैयक्तिक ड्रीम प्रोजेक्ट आहे असे सांगून, ज्यांनी सदस्यांना या पध्दतीने प्रस्ताव मान्य करायला लावला त्यांच्यावर केलेले आरोप, या नगरसेवकांनी आपल्यावर ओढवून घेऊ नयेत. त्याचबरोबर ज्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांना चर्चा करावयास अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही कसबा बावड्यातील हनुमान मंदिरात चर्चेला आणि शपथ घेण्यासाठी यायला तयार आहोत.