आनंदयात्री फेसबुक समूहाच्या वतीने उद्या (मंगळवारी) एकांकिका सादरीकरण..
आनंदयात्री फेसबुक समूहाच्या वतीने शाहू स्मारक भवनात नेबर, पलंबर आणि ती, ऑलमोस्ट डेड आणि कलम 375 या एकांकिकांचं सादरीकरण होणार आहे. पनवेल येथे होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरच्या या तिन्ही एकांकिका सहभागी होत आहेत. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारी नवोदित कलाकार मंडळी आपली कला सादर करणार असून, प्रेक्षकांना दर्जेदार एकांकिकांचा आनंद घेता येणार आहे. सकाळी 10.30 पासून या एकांकिका सुरू होतील.
आनंदयात्री फेसबुक समूह गेल्या काही वर्षांपासून सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीला चालना देत आहे. या समूहाचे उपक्रम प्रमुख प्रशांत काळे यांनी सांगितले की आमचा उद्देश मराठी नाट्य परंपरेला जपताना नव्या पिढीला रंगभूमीशी जोडणे हा आहे. ही स्पर्धा नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन प्रदान करेल. एकांकिक पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. कोल्हापूर शहरातील व परिसरातील रसिकांनी या एकांकिकांचा जरूर आनंद घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
या एकांकिका आयोजित करण्यासाठी उद्योजक श्रीकांत पोतनीस, गिरीश सामंत, शिरीष बंदरकर, संदीप गुळवणी यांच्यासह कोल्हापूर व जिल्ह्यातील आनंदयात्री मेम्बर्सनी सहकार्य केले आहे..