अनंत दीक्षित, मोहन मस्कर स्मृती पुरस्काराचे शनिवारी वितरण
कोल्हापूर : जेष्ठ संपादक अनंत दीक्षित स्मृती पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि.१० मे ) येथील शाहू स्मारक भवनात सायंकाळी ५.३० वाजता होत आहे. खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होईल. कोल्हापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संपादक अनंत दीक्षित आणि तरुण पिढीतील हरहुन्नरी पत्रकार मोहन मस्कर यांच्या स्मृती जपण्यासाठी यंदापासून त्यांच्या नावे पुरस्कार सुरू करीत आहोत. अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार
ज्येष्ठ संपादक कुमार केतकर तर मोहन मस्कर स्मृती पुरस्कार भारतातील ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांना यापूर्वीच जाहीर झाला आहे. दीक्षित यांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरात या पहिल्या पुरस्काराचे वितरण होत आहे. या सोहळ्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यास सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन स्मृती समितीने केले आहे.
——————