आणू महादेवीला घरी.. दोन लाख चार हजार चारशे एकवीस कोल्हापुरकरांनी दिली स्वाक्षरी*

Spread the news

*आणू महादेवीला घरी.. दोन लाख चार हजार चारशे एकवीस कोल्हापुरकरांनी दिली स्वाक्षरी*

 

  •  

 

 

*माजी आमदार ऋतुराज पाटील नांदणी गावाकडे रवाना*

*कोल्हापूर :* नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापुरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी ही पत्रे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नांदणी येथील मठात महास्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी केलेल्या या सर्व फॉर्मचे पूजन करण्यासाठी रवाना झाले दुपारी १ वाजता रमणमळा पोस्ट ऑफीस येथून हे सर्व फॉर्म भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मूर्म यांना पाठविण्यात येणार आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते नांदणी गावात दाखल झाले आहेत या ठिकाणी महा स्वामीजी यांच्या हस्ते पत्रांची पूजन करून पोस्ट कार्यालयाकडे जाणार आहे
महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या स्वाक्षरी अभियान अंतर्गत देशभरातील 2 लाख 4 हजार 421 लोकांच्या स्वाक्षरी असलेले सर्व फॉर्म घेऊन ऋतुराज पाटील यांनी नांदणी मठाकडे लोकांसह प्रयाण केले.

नांदणी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते या स्वाक्षरी केलेल्या सर्व फॉर्मचे पूजन करण्यात येणार आहे.

दुपारी 1 वाजता रमणमळा पोस्ट ऑफिस, कोल्हापूर येथून हे सर्व फॉर्म आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत भारताच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!