पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने प्रयत्न करा मनसेच्या मेळाव्यात यशवंत किल्लेदार यांचे आवाहन

Spread the news

माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्त नूतन संपर्क अध्यक्ष मा यशवंत किल्लेदार सो व नंदकुमार जी चिले सो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांचा मेळावा शासकीय विश्राम गव्हाच्या राजश्री शाहू सभागृहामध्ये पार पडला.

­

 

याप्रसंगी नूतन संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी म्हटले की मा राज साहेब ठाकरे यांचा लवकरच कोल्हापूर दौरा होणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीसाठी जोमाने प्रयत्न करा. तसेच इथून पुढे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याला त्यांचा अहवाल ऑनलाइन स्वरूपात संपर्क अध्यक्षंना सादर करणे बंधनकारक असेल. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नवीन होतकरू कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल.
नूतन संपर्काध्यक्ष नंदकुमार चिलेसो यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची पुनर्रचना करून त्याद्वारे पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे. समाज उपयोगी कामे करून राज साहेबांचे विचार कोल्हापूरच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी

  •  

सदरहू बैठकीस जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले , दौलत पाटील, नागेश चौगुले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील , अभिजीत राऊत ,प्रताप पाटील, रवी गोंदकर, राजेंद्र चव्हाण, निलेश धुम्मा , राजू पाटील, अभिजीत पाटील, संजय चौगुले, विजय करजगार , अमित पाटील, प्रभात साबळे इ. मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!