खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी रोहिणी येडगे तर व्हाइस चेअरमन पदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर यांची बिनविरोध निवड

Spread the news

*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी रोहिणी येडगे तर व्हाइस चेअरमन पदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर यांची बिनविरोध निवड*
*कोल्हापूर-*
*कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी रोहिणी येडगे तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी सोनाळकर यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेत या निवडी पार पडल्या.सभेच्या अध्यक्ष स्थानी अध्यासी अधिकारी म्हणून महेश शेलार व संस्थापक भरत रसाळे यांच्या प्रमुख उपस्थितत या निवडी पार पडल्या*
*सर्वप्रथम चेअरमन पदासाठी रोहिणी येडगे यांचे नाव वर्षाराणी वायदंडे यांनी सुचविले त्यास कृष्णात चौगले यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी सोनाळकर यांचे नांव सताप्पा कासार यांनी सुचविले तर अरुण गोते यांनी अनुमोदन दिले.या निवडी बिनविरोध पार पडल्या.*
*यावेळी बोलताना संस्थापक भरत रसाळे म्हणाले की संस्था उत्तरोतर प्रगतीपथावर आहे. असाच संस्थेचा चढता आलेख नूतन चेअरमन व्हाइस चेअरमन ठेवतील असा विश्वास व्यक्त केला. सुरवातीपासूनच संस्थेचा कारभार पारदर्शी व काटकसरीचा सुरू आहे*
*यावेळी बोलताना नूतन चेअरमन रोहिणी येडगे म्हणाल्या की संस्थेचा कारभार संस्थेचे संस्थापक आदरणीय भरत रसाळे यांच्या मार्गदर्शनानुसारच होणार आहे मला दिलेल्या संधीचा मी संस्थेच्या उत्कर्षासाठीच प्रयत्न करणार आहे*
*यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी सोनाळकर, माजी चेअरमन साताप्पा कासार, संचालक मच्छिंद्र नाळे, वर्षाराणी वायदंडे,संतोष आयरे यांनी मनोगत व्यक्त केली.आभार माजी व्हाईस चेअरमन अमित परीट यांनी मानले*
*यावेळी संचालक सर्वस्वी सर्जेराव नाईक, राजेश कोंडेकर, राजेंद्र कोरे, संदीप सातपुते,विनोद घुले, कार्यकारी संचालक – सदाशिव साळवी यांच्यासह सल्लगार मंडळ सदस्य, मुख्याध्यापक,शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
….
मा संपादक सो
स . न . वि . वि .
वरील वृत्त आपले लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करणे विषयी विनंती आहे
.
भरत रसाळे (संस्थापक )
खाजगी प्राथमिकशिक्षक सेवक सहकारी पतसंस्था

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!