*आज शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन* *शिक्षक महासंघाच्या वतीने* *महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची* *अन्यायकारक संच मान्यता रद्द करण्यासाठी पुणे आयुक्त* *कार्यालय व शिक्षण संचालक कार्यालय येथे विराट मोर्चा व धरणे आंदोलन* *आयोजित केले होते. यामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या*
1. *30 विद्यार्थ्यांची सायन्स ची प्रॅक्टिकल बॅच पूर्वीप्रमाणे* *20 विद्यार्थ्यांची करावी.*
*2. वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाची तासिका पूर्वीप्रमाणे 45* *मिनिटाची करावी.*
*3. पर्यावरण शिक्षक व शारीरिक शिक्षक यांचे यांचे तास इतर शिक्षकांना* *देऊ नये या शिक्षकांना सेवा शाश्वती द्यावी.*
*4.अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ पदी उन्नयन करणे.*
*5.दोन विषयाचा कार्यभार एकत्र असणाऱ्या शिक्षकांना* *पूर्वीप्रमाणे मान्यता देण्यात यावी*
*6. वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ* *महाविद्यालयास 40 मिनिटाची तासिका बनल्यास तुकडीची* *विद्यार्थी संख्या ही 120 ऐवजी 60 प्रमाणे गणली जावी.*
*7. आय.टी विषय अनुदानित करून शिक्षकांना वेतन द्यावे.*
*यासह विविध 15 मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक* *श्रीराम पानझडे* *साहेब यांना देण्यात आले.*
*यावेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक* *महासंघाचे अध्यक्ष. प्रा. डॉ. संजय शिंदे. मार्गदर्शक* *मुकुंद आंधळकर. कोल्हापूर जिल्हा शिक्षक* *संघटनेचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब बागडी. सचिव* *प्रा. बी एस पाटील.उपाध्यक्ष प्रा.विजय* *मेटकरी.परीक्षा विभाग सचिव प्रा. पी.बी.रक्ताडे .प्रा.बी.आर.* *पाटील प्रा. विनायक चव्हाण* *उपप्राचार्य, प्रा.दिलीप संकपाळ. प्रा.अशोक चव्हाण. प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे. प्रा.* *रत्नदीप पवार. प्रा. राहुल* *चौगले. प्रा.दिनेश चिकुर्डे. प्रा. प्रवीण रसाळे. प्रा. मेघदूत पाटील.प्रा. एच बी जवळे. प्रा.* *शिवाजी अंगज.प्रा.विशाल कोकरे. प्रा. अनिल पवार. प्रा. संदीप* *कोळी.प्रा. हेमंत गव्हाणे. यास कोल्हापूर जिल्ह्यातून 250* *पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते संपूर्ण* *महाराष्ट्रातून 5000 पेक्षा अधिक शिक्षक उपस्थित होते.*
*यावेळी महासंघाच्या* *आंदोलनास.आमदार जयंत आ सगावकर .माजी आमदार भगवानराव साळुंखे.माजी* *आमदार दत्तात्रय सावंत.माजी आमदार सुधीर तांबे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य* *कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे. पंढरपूरच्या स्वीरी* *शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बब्रुवान रोंगे. शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष* *शिवाजीराव खांडेकर. मराठवाड्याचे नरेंद्र* *काळे. शिक्षक सेनेचे सुनील भाऊ जगताप. पुणे* *वाडिया कॉलेजचे सानप साहेब.* *यासह आजी-माजी पदाधिकारी व विविध संघटनांचे अध्यक्ष आणि संस्थाचालक* *यांनी मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दिला.मोर्चासाठी आलेल्या* *5000 शिक्षकांच्या भोजनाची व्यवस्था वाडिया* *कॉलेजच्या वतीने करण्यात आली.*🙏🙏🙏🙏🙏



