जागा खरेदी परवानगीसाठी लिंगायत माळी समाजाचे शिष्टमंडळ प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांना भेटले
इचलकरंजी, गुरुवार दि. १० सप्टेंबर २०२६ : इचलकरंजी लिंगायत माळी समाजाच्या वतीने समाजासाठी जागा खरेदी करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळावी, यासाठी समाजाच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी श्री. दीपक शिंदे साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली. समाजाच्या जागा खरेदीसंदर्भातील संपूर्ण माहिती शिष्टमंडळाने त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी प्रांत अधिकारी श्री. दीपक शिंदे साहेब यांनी समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून “याबाबत सकारात्मक विचार करू,” असे आश्वासन दिले. त्यामुळे समाजाच्या जागा खरेदीच्या प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
उपस्थित समाजबांधव
समाजाचे आधारस्तंभ श्री. मुकुंद महादेव माळी, समाजाध्यक्ष श्री. रमेश महादेव माळी, खजिनदार श्री. कुमार माळी, तसेच श्री. हरिभाऊ माळी, श्री. सुहास माळी, श्री. सुरेंद्र माळी, श्री. बाळासाहेब माळी, श्री. अनिल माळी, श्री. कुबेर माळी, श्री. महेश माळी, श्री. श्रीकांत माळी, श्री. विनोद कारंडे व श्री. चमकेरी उपस्थित होते.



