गोकुळसाठी रामचंद्र भोगम यांची उमेदवारी निश्चित व्हावी! शक्तीप्रदर्शनातून कार्यकर्त्यांचा ठाम संदेश; करवीर-पन्हाळा-गगनबावडा -राधानगरीतील ठरावधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the news

गोकुळसाठी रामचंद्र भोगम यांची उमेदवारी निश्चित व्हावी!

­

 

 

  •  

शक्तीप्रदर्शनातून कार्यकर्त्यांचा ठाम संदेश; करवीर-पन्हाळा-गगनबावडा -राधानगरीतील ठरावधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

कोल्हापूर | सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६

 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबा गावचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व उद्योगपती मा. श्री. रामचंद्र भोगम (साहेब) यांनी आज मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

भोगम साहेबांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी करवीर, पन्हाळा, गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यातील मोठ्या संख्येने ठरावधारक, समर्थक व कार्यकर्ते उपस्थित राहिले. कार्यकर्त्यांचा उत्साह, उपस्थिती आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 

या शक्तीप्रदर्शनातून केवळ उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर “रामचंद्र भोगम यांना गोकुळची उमेदवारी मिळालीच पाहिजे” असा ठाम संदेश कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचविला आहे.

 

सहकार क्षेत्रातील अनुभव, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क, विविध तालुक्यांमध्ये असलेला जनसंपर्क आणि संघटनात्मक कामाची जाण या पार्श्वभूमीवर भोगम साहेबांसारख्या अनुभवी आणि कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय असलेल्या नेतृत्वाला गोकुळच्या निवडणुकीत संधी मिळणे आवश्यक असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

 

गोकुळ ही केवळ निवडणूक नसून कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था आणि सहकार क्षेत्राशी निगडित महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेले, ठरावधारकांशी सातत्याने संपर्क ठेवणारे आणि सहकार क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव असलेले नेतृत्व गोकुळच्या संचालक मंडळात असावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

 

आजच्या मोठ्या उपस्थितीने करवीर परिसरातून रामचंद्र भोगम यांच्या उमेदवारीसाठी निर्माण झालेला जनसमर्थनाचा सूर स्पष्टपणे दिसून आला. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कार्यकर्त्यांची भावना आणि आजच्या शक्तीप्रदर्शनाची दखल घेत रामचंद्र भोगम साहेबांना गोकुळच्या उमेदवारीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

 

“एकच मागणी… भोगम साहेबांना संधी मिळालीच पाहिजे!”


Spread the news

You may also like

error: Content is protected !!