देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्काराने ‘शाहू’चा दिल्लीत गौरव शानदार सोहळ्यात दिमाखात झाले पुरस्कार वितरण

Spread the news

देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्काराने ‘शाहू’चा दिल्लीत गौरव

­

 

शानदार सोहळ्यात दिमाखात झाले पुरस्कार वितरण

  •  

कागल, प्रतिनिधी :
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने देशाच्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा अव्वल स्थान अधोरेखित केले आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्यावतीने हंगाम २०२४-२५ साठी उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार शाहू कारखान्यास प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी कारखान्याच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर,राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील छत्तीसगडचे सहकार मंत्री केदारनाथ कश्यप,गुजरातचे जलसंसाधन आणि आपत्ती राज्यमंत्री ईश्वरसिंग पटेल, पंजाबचे कृषिमंत्री गुरमीतसिंग खुड्डीया आदी उपस्थित होते.

देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज् यांच्याकडून हंगाम २०२४-२५ मधील कामगिरीची दखल घेत शाहू कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड केली होती. त्याचे वितरण आज नवी दिल्ली येथे करण्यात आले.
या पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, कारखान्याला आजअखेर ७३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील २८,तर राज्य पातळीवरील ४५ पुरस्कारांचा समावेश आहे.

कोट
राजे समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष शाहू उद्योग समूह
हा पुरस्कार म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताचा वारसा,कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना चालविताना घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांचे मार्गदर्शन, सभासद व शेतकऱ्यांनी विश्वासाने दिलेली साथ आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा गौरव आहे.सहकारी संचालक मंडळ, सभासद, शेतकरी, कर्मचारी व पुरवठादार यांच्या वतीने हा पुरस्कार स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांना अर्पण करतो.त्यांनी घालून दिलेल्या पायवाटेनेच शाहूचे व्यवस्थापन व प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. स्वर्गीय राजे साहेबांच्या पश्चात सांघिक कामगिरीमुळेच ‘शाहू’चा नावलौकिक टिकवता आला,किंबहुना त्यामध्ये भर घालता आली,याचा अभिमान आहे.

छायाचित्र- नवी दिल्ली येथे
श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वीकारताना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,सोबत उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,जेष्ठ संचालक कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,सर्व संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण व इतर मान्यवर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!