कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. जितेंद्र वसगडेकर
यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. जितेंद्र निनाप्पा वसगडेकर यांची दि.२४/०९/२०२६ रोजी बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून श्री.यु.एस.उलपे कार्यालय अधिक्षक अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर हे होते. चेअरमन पदासाठी श्री. संजय शिंदे यांनी नाव सुचविले व श्री. नंदिप मोरे यांनी अनुमोदन दिले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सहकारामधील दिपस्तंभ व उल्लेखनिय कारभाराबाबत नावलौकीक प्राप्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची मातृसंस्था असलेल्या या संस्थेने जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचारी यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्ष करण्यामध्ये या संस्थेने नेहमीच मोलाचा हातभार लावलेला आहे. संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करणेस आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबध्द आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकीकात भरीव वाढ करणेकामी निश्चित नियोजनबद्द काम करणेची ग्वाही दिली तसेच यापुढेही संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार व सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपणे, काटकसरीने करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणार असलेचे नुतन चेअरमन यांनी निवडीच्या वेळी सांगीतले.
निवडीवेळी व्हा. चेअरमन जयकुमार रेळेकर व सर्व संचालक तसेच संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम.एम.पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन.डी.पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट, कपिल पाटील उपस्थित होते.



