तुम्ही शंभरी पार कराल सतेज पाटील यांनी पैलवान बंडा पाटील रेठरेकर यांना दिला धीर

Spread the news

*तुम्ही शंभरी पार कराल सतेज पाटील यांनी पैलवान बंडा पाटील रेठरेकर यांना दिला धीर*

­

 

*कोल्हापूर :* १९६४ च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे शाहूवाडी तालुक्यातील रेठरे येथील ज्येष्ठ पैलवान बंडा पाटील रेठरेकर यांची आमदार सतेज पाटील यांनी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली. ‘तुम्हाला काहीही होणार नाही, सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही लवकर बरे व्हाल आणि शंभरी पार कराल, काळजी करू नका,’ अशा शब्दांत सतेज पाटील यांनी त्यांना धीर दिला.
वयाच्या ऐंशीव्या वर्षी विविध आजारांनी त्रस्त असलेल्या पैलवान बंडा पाटील यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन आस्थेने विचारपूस केली होती. तसेच औषधोपचारासाठी तत्काळ एक लाख रुपयांची मदत केली होती. त्याचबरोबर डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास मोफत उपचार केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. त्यानुसार बंडा पाटील यांना काही दिवसांपूर्वी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आज सतेज पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. सतेज पाटील यांनी केलेली आपुलकीची विचारपूस आणि दिलेला धीर यामुळे पैलवान बंडा पाटील रेठरेकर भावूक झाले. ‘तुमच्यामुळेच मला जीवनदान मिळाले,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

  •  

पैलवान बंडा पाटील यांच्या उपचारासाठी यापूर्वीही सतेज पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत करत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला होता.
या भेटीप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सागर पाटील, अमोल चौगले, पूजा पाटील, वृषाली पाटील, देवश्री पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय व अन्य मान्यवर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!