सस्नेह जय महाराष्ट्र 🚩
माननीय पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूरचे शिवसैनिक व नगरसेवक श्री. सुनील मोदी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना उपनेते व कोल्हापूर लोकसभा संपर्कप्रमुख मा. अरविंदभाई दूधवडकर, पुणे शहरप्रमुख व महाराष्ट्र राज्य संघटक मा. वसंत मोरे, तसेच कोल्हापूर दक्षिण उपशहरप्रमुख श्री. युवराज खंडागळे यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण ताकदीने, एकजुटीने आणि संघटितपणे लढण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली करण्याचा ठरला आहे



