मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचा 30 ऑक्टोबर रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा.

Spread the news

मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचा 30 ऑक्टोबर रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा.

­

 

इचलकरंजी :महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींचे बंद केलेले अनुदान चालू करा, इचलकरंजी शहरातील बंद केलेले रेशनवरील धान्य चालू करा या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाच्या वतीने 11 वाजता इचलकरंजी प्रांतकार्यालयावर प्रचंड मोर्चा आयोजित केला आहे, असे पत्रक पक्षाचे शहर सेक्रेटरी कॉ. भरमा कांबळे यांनी प्रसिद्दीस दिले आहे.

  •  

काल पक्षाची शहर कमिटीची मिटिंग झाली यामध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील 91 लाख लाडक्या बहिणींचे अनुदान बंद केले आहे,त्यामध्ये इचलकरंजी शहरातील हजारो लाडक्या बहिणींचा समावेश आहे तसेच इचलकरंजी शहरातील 6000 रेशन कार्डधारकांचे रेशन बंद केले आहे आणि अजून 10 हजार लोकांचे धान्य बंद करणारअसलेचे समजते त्यामुळे लाडक्या बहिणी आणि रेशन कार्ड धारकांमध्ये प्रचंड असंतोष तयार झाला आहे. ज्यांनी घरबांधणीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढताना आय टी ची फाईल केली असे सर्व लोक कामगार आहेत, बँकेने सांगितले म्हणून फाईल केली आणि त्यामुळे आत्ता लाडक्या बहिणीचे अनुदान आणि रेशन बंद करून महाराष्ट्र सरकार या कामगार वर्गांवर अन्याय करीत आहे, लाडक्या बहिणीना मतासाठी पैसे दिले, रेशन दिले आणि आत्ता त्यांचे काम झाल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडनेचे काम भाजप सरकार करीत आहे, याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे,
या मोर्चात ज्यांचे रेशन बंद झाले आहे, ज्या लाडक्या बहिणींचे अनुदान बंद झाले आहे अशा सर्व बहिणी आणि भावानी या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन करीत आहोत,

या मीटिंगला कॉ. सदा मलाबादे, भाऊसाहेब कसबे, धनाजी जाधव, नूरमहंमद बेळकुडे, पार्वती म्हेत्रे, नबीसो शेख, विलास गवड, गोपाळ पोला, रामचंद्र सौन्दत्ते उपस्थित होते.

कॉ. भरमा कांबळे

कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात ही बातमी प्रसिद्ध करावी
🙏


Spread the news

You may also like

error: Content is protected !!