*सायबर सुरक्षेचे ज्ञान आत्मसात करून जनजागृती करा -डॉ. कपिल वानखेडे* -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स परिषद उत्साहात

Spread the news

*सायबर सुरक्षेचे ज्ञान आत्मसात करून जनजागृती करा -डॉ. कपिल वानखेडे*
-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स परिषद उत्साहात

­

 

कोल्हापूर : प्रतिनिधी
सायबर सुरक्षेचे ज्ञान आत्मसात करून इतर विद्यार्थ्यांमध्येही जागरूकता निर्माण करा. तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करून प्रत्येक डिजिटल व्यवहारात सायबर सुरक्षेची तत्त्वे अंगीकारा, असे आवाहन सर्ट-इनचे डॉ. कपिल वानखेडे यांनी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये आयोजित ‘सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स २०२६’ या दोन दिवसीय परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

  •  

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहिती सुरक्षा शिक्षण व जागरूकता (आयएसईए) प्रकल्पाच्या सहकार्याने तसेच प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सर्ट-इन) यांच्या सहयोगाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संचालक डॉ. अजित एस. पाटील यांनी स्वागत केले. सी-डॅक, मुंबईचे दिव्यांश बघेल विशेष परीक्षक म्हणून उपस्थित होते. कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी ऑनलाइन फसवणूक, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन केले.

परिषदेत संयुक्त राष्ट्र महासभा (यूएनजीए) आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (यूएनएचआरसी) या समित्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा, राजनैतिक वाटाघाटी आणि ठराव प्रक्रियेत सहभाग घेतला. अभिलाषा अडसूळे, सई आवळे, हृषिकेश शाहणे आणि पार्श्वजीत पाटील यांनी समित्यांचे संचालन केले, तर अंजिलाह धळाईत हिने आंतरराष्ट्रीय पत्रकारिता विभागाचे नेतृत्व केले.

यूएनजीएमध्ये एस्टोनियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिभव उमेश बालखंडे याला उत्कृष्ट प्रतिनिधी, निलय कुलकर्णी याला विशेष प्रशंसापत्र, ध्रुव घोरपडे याला विशेष उल्लेख, हनी आदित्य प्रताप सिंग हिला उत्कृष्ट वक्ता आणि ईशा सरदेसाई हिला उत्कृष्ट स्थितिपत्राचा पुरस्कार मिळाला.

यूएनएचआरसीमध्ये युनायटेड किंगडमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समीक्षा मंथन गवळी हिला उत्कृष्ट प्रतिनिधी, साई उमेश धुमाळे याला विशेष प्रशंसापत्र, गार्गी जिरगे हिला विशेष उल्लेख, रुतुजा अविनाश पुजारी हिला उत्कृष्ट वक्ता आणि श्रेयस राजेंद्र चोरगे याला उत्कृष्ट स्थितिपत्राचा पुरस्कार मिळाला. परिषदेच्या वृत्तांकनाची जबाबदारी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकारिता पथकाने पार पाडली. उत्कृष्ट पत्रकार म्हणून सुमेरा शेख हिला गौरविण्यात आले.

कार्यक्रमास डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. ग्रंथेज ओतारी आणि डेटा सायन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. तानाजी पाटील उपस्थित होते. समन्वयक म्हणून प्रा. अमृत काजवे यांनी जबाबदारी पार पडली.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील व पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

*कोल्हापूर -* सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स मध्ये मार्गदर्शन करताना डॉ. कपिल वानखेडे. समवेत संजय हारुगडे, डॉ. अजित पाटील आदी.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!