*अथणी शुगर्स चालू गळीत हंगाम ऊस दर रु. ४२०० प्रती मॅट्रिक टन प्रमाणे जाहीर*
: *श्री श्रीनिवास पाटील*- मॅनेजिंग डायरेक्टर
बांबवडे वार्ताहर :
बांबवडे येथील येथील अथणी शुगर्स साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम २०२६-२७ साठी ऊस दर रु.४२०० रु. प्रती मॅट्रिक टन प्रमाणे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री श्रीनिवास पाटील यांनी जाहीर केला असून सदर दरामध्ये ऊस गळीत झाल्यानंतर पहिला हप्ता रु. ३९०० /- प्रती मे.टन. , कारखाना बंद झाल्यानंतर दुसरा हप्ता रु. १०० /-.प्रती मे.टन., आणि साखरेचा वर्ष अखेर सरासरी दर हा रु.४५/- प्रती किलो पुढे राहिला तर तिसरा अंतिम हप्ता रु.२०० /- प्रती मे.टन. पुढील दिपावली पर्यंत याप्रमाणे एकूण रु. ४२००/- प्रती टन देण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय सभासद/ बिगर सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रती मे.टन. – एक किलो साखर ही सुद्धा दिपावली सणानिमित्त देण्यात येणार आहे असे सांगितले.
या वेळी अथणी शुगर्स चे जाॅईट मॅनेजिंग डायरेक्टर श्री योगेश पाटील म्हणाले की, सन २०२६-२७ गळीत हंगामासाठी कारखान्यातील सर्व कामे पूर्ण झाली असून यंदा ५.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखाना नुकताच सुरु करण्यात आला आहे. अथणी शुगर्स माध्यमातून एफ.आर.पी.पेक्षा जादा ऊस बिल व तोडणी वाहतूक बिल वेळेत देण्याची परंपरा कायम जोपासली आहे. ती याही वर्षी सालाबाद प्रमाणे सर्व बिल इतरांच्या तुलनेत जास्त देण्याचा मानस आहे. चालू वर्षी राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कारखानदारी पुढे अनेक अडचणीवर मात करत पुढील वाटचाल सुरु असून भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व वाहतूक दार यांनी सर्वांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन सहकार्य करावे. ही आवाहन केले आहे.
त्याप्रसंगी उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्री मानसिंगराव गायकवाड, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक चे विद्यमान संचालक रणवीर सिंग गायकवाड व इतर संचालक, युनिट हेड रवींद्र देशमुख, कार्यकारी संचालक भगवान पाटील, चीफ अंकौंटट भानुदास पाटील, चीफ इंजिनियर शिवाजी बंडगर, चीफ केमिस्ट मारुती पाटील, मुख्य शेती अधिकारी विनोद पाटील,प्रशासनाचे जगन्नाथ जोशी, लेबर ऑफिसर उमेश हांडे, सुरक्षा अधिकारी पवार, व इतर सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी वृंद यांची प्रमुख उपस्थितीत होते.



