इचलकरंजी –
काेल्हापूर सांगली पाठाेपाठ आता इचलकरंजी महापालिका क्षेत्रात महापूर नियंत्रणाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जागतिक बँक आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थसहाय्यातून साकारण्यात येणाèया या 419 काेटी रुपये खर्चाच्या प्रकल्पामुळे इचलकरंजी शहर परिसरात महापूराचा धाेका टळणारी अनेक महत्वपूर्ण कामे हाेणार आहेत, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देववेंद्र फडणवीस यांनी काेल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापूराचे नियंत्रण करण्यात यावे आणि याचवेळी या महापूराचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवणारे असे दाेन महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. काेल्हापूर व सांगली या दाेन ठिकाणी यापूर्वी 3200 काेटी रुपये खर्चाचा महापूर नियंत्रण प्रकल्प राबविला जाणार आहे. इचलकरंजी या महापालिका क्षेत्रालाही महापूराचा फटका बसत असल्याने या शहराचा या प्रकल्पामद्ये सामवेश करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न केले हाेते. त्यातून आता 419 काेटी रुपयांचा हा प्रकल्प इचलकरंजी परिसरात राबविला जाणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून 70 टक्के तर महाराष्ट्र शासनाकडून 30 टक्के अर्थसहाय्य मिळणार असून इचलकरंजी महापालिकेवर काेणताही आर्थिक भार पडणार नाही. या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील निविदा मागविल्या जाणार असून हे काम कालबध्द पध्दतीने पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पातंर्गत यशाेदा पुल, लक्ष्मी दड्ड, काळा आणि चंदूर ओढा या चार प्रमुख ठिकाणी भरीव तटबंदीचे काम केले जाणार आहे. याद्वारे महापूर नियंत्रणाबराेबरच पंचगंगा प्रदुषणालाही आळा बसणार आहे. तसेच या ओढ्यांसह शहापूर खणीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. काळ्या ओढ्याच्या लगत असलेल्या सर्व विहिरीची स्वच्छता करुन त्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. चंदूर व काळा ओढा बंधारे बांधण्यात येणार आहेत. पंचगंगा नदीचे खाेलीकरण करण्यासाठी गाळ काढण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाणार असून हे सर्व साहित्य शासकीय जागेवर ठेवले जाणार आहे. स्टाॅर्म वाॅटर अंतर्गत सुमारे 150 किलाेमीटर अंतराच्या गटारी बांधण्यात येणार आहेत.
सर्वाधिक उंचीचा तिरंगा
यापूर्वी पंचगंगा नदीघाटाच्या साैंदर्यीकरणाचे काम 2 काेटी रुपये निधीतून केले जात आहे. पंचगंगा नदी हे पर्यटनाचे आकर्षण केंद्र व्हावे यासाठी या घाटावर राज्यातील सर्वात उंच 111 मीटरचा तिरंगा ध्वज फडकविला जाणार आहे. मुबंई, पुणे, काेल्हापूर आदी ठिकाणी उंच तिरंगा ध्वज उभारले आहेत. यातील सर्वात माेठा तिरंगा 108 मीटर उंचीचा आहे. आता इचलकरंजीत सुमारे साडेपाच काेटी रुपये खर्च करुन राज्यातील सर्वात माेठा तिरंगा ध्वज हे इचलकरंजीच्या आकर्षणाचा आणि पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. यावेळी महापाैर उदय धातुंडे, उपमहापाैर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतिश मुळीक, गटनेते विठ्ठल चाेपडे, प्रकाश दत्तवाडे आदी उपस्थित हाेते.



