UMEED उपक्रमतर्गत बचत गटांना कोल्हापूर विमानतळावर स्टॉल; अरुंधती महाडिक यांची भेट

Spread the news

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाच्या UMEED उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांना नवे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. याच उपक्रमांतर्गत निवडक बचत गटांना कोल्हापूर विमानतळ येथे खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्टॉलला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी भेट दिली.

­

 

यावेळी त्यांनी महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची पाहणी करून महिला उद्योजिकांना शुभेच्छा दिल्या. महिलांनी उभारलेला हा स्वावलंबनाचा प्रवास निश्चितच अधिक उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  •  

कोल्हापूरातील भागीरथी महिला संस्थेशी संलग्न अनेक बचत गटांनी या संधीचा लाभ घेत नोंदणी करून आपली उत्पादने बाजारपेठेत आणली आहेत. या स्टॉलवर घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, ड्रायफ्रूट्स तसेच इतर उत्पादने प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना स्थानिक महिलांच्या हातची स्वादिष्ट आणि दर्जेदार उत्पादने थेट विमानतळावरच मिळणार आहेत.
खासदार धनंजय महाडिक


Spread the news

You may also like

error: Content is protected !!