सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे १६ ते ३० नोव्हेंबरचे उसबिल जमा* *तोडग्यानुसार उर्वरित रू. १०० गाळप हंगाम समाप्तीनंतर* *अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती*

Spread the news

*सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे १६ ते ३० नोव्हेंबरचे उसबिल जमा*

­

 

*तोडग्यानुसार उर्वरित रू. १०० गाळप हंगाम समाप्तीनंतर*

  •  

*अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती*

*बेलेवाडी काळम्मा, दि. ९:*
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या दि. १६ नोव्हेंबर ते दि. ३० नोव्हेंबर या पंधरवड्यातील प्रतिटनाला रू. ३४०० प्रमाणे उसबिले जमा केली आहेत. तोडग्यानुसार प्रतिटनाला रू. १०० गळीत हंगाम समाप्तीनंतर दिले जाणार आहेत. अशी प्रतिटनाला एकूण रू. ३, ५०० ॲडव्हान्स होणार आहे. या दुसऱ्या पंधरवड्यात कारखान्याने ९६, ५४९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान; एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या पंधरवड्यातील तोडणी वाहतूक बिलेही अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष श्री. नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, तोडग्यानुसार रु. ३४०० पहिला हप्ता आणि उर्वरित रू. शंभर कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर असे प्रतिटनाला एकूण ॲडव्हान्स रु. ३५०० दिले जाणार आहेत, असे जाहीर केले होते. त्यानुसार, सरसेनापती सताजी घोरपडे साखर कारखान्याकडे गाळप हगाम २०२५-२६ मध्ये दि. १६ नोव्हेंबर ते दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळपास आलेल्या ९६, ५४९ मेट्रिक टन उसाची बिले प्रतिटन रू. ३४०० प्रमाणे अदा केली आहेत. तसेच; तोडग्यानुसार द्यावयाचे उर्वरित रू. १०० गाळप हंगामानंतर अदा करणार आहोत. गुरूवारपासून दि. ११ शेतकऱ्यांनी आपापल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आज अखेर २, ५६, ५२५ मेट्रीक टन इतके गाळप केले असून सरासरी ११.१८ टक्के साखर उता-याने २, २९, ६०० क्विंटल इतकी साखर उत्पादित केली आहे. दरम्यान; आजचा साखर उतारा १२.५५ टक्के इतका आहे. दि. ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर कालावधीत गाळप केलेल्या १,०८,२५५ मेट्रीक टनाची रू. ३४०० प्रतीटन प्रमाणे उसबिले यापूर्वीच अदा केली आहेत. अशाप्रकारे आजअखेर एकूण २, ०४, ८१० मेट्रिक टनांची उसबिले अदा झालेली आहेत. चालू हंगामात आज अखेर को-जन प्रकल्पातून दोन कोटी, १८ लाख युनिट इतकी वीज निर्मिती करून एक कोटी, ४८ लाख युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे. चालू हंगामात सरसेनापती साखर कारखान्याने सात लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असून शेतक-यांनी आपण पिकवलेला संपूर्ण उस सरसेनापती साखर कारखान्याकडे गाळपास पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.
=======


Spread the news

You may also like

error: Content is protected !!