अथर्व शिंदे, तन्वी पाटील ठरले डी. वाय.पॉलिटेक्निकचे बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्स

Spread the news

अथर्व शिंदे, तन्वी पाटील ठरले
डी. वाय.पॉलिटेक्निकचे बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्स

­

 

कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील बेस्ट आउटगोइंग स्टुडंट म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी अथर्व शशिकांत शिंदे आणि तन्वी जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली. डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.ए.के. गुप्ता आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

  •  

या विद्यार्थ्यांची तीन वर्षातील शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आदी क्षेत्रातील गुणवत्ता आणि मुलाखत याद्वारे ही निवड करण्यात आली.

याबरोबरच सुतेज सुशांत शेटगे ( सिव्हिल), साहिल संजय गोदे (मेकॅनिकल), पार्थ सागर जाधव आणि राही राहुल पाटील ( कॉम्प्युटर इंजिनियरिंग) आणि आर्यन शिवाजी खोत ( कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग) या विद्यार्थ्यांना त्यांच्या डिपार्टमेंटचे बेस्ट आउटगोइंग स्टुडंट म्हणून गौरविण्यात आले.

याबरोबर बेस्ट हिरकणी मृणाल सागर चौगले, पॉली प्रिन्स हर्षवर्धन रणनवरे, पृथ्वीराज ढवण , पॉली प्रिन्सेस अर्पिता पाटील , पूर्वा तोडकर यांना सन्मानित करण्यात आले.

या वेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभागप्रमुख प्रा.डॉ.पी.के.शिंदे, प्रा. एस.बी.शिंदे, प्रा.अक्षय करपे,प्रा. शीतल साळोखे, प्रा.अजय बंगडे उपस्थित होते.
प्रा.राज अलास्कर यांनी सूत्रसंचालन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!