राज्यातील सहकारी पतसंस्थांना आर्थिक स्थिरता व नियामक मंडळाच्या नियमावलीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून नियामक मंडळ सक्षमीकरण करणार राज्यातील सहकारी पतसंस्थांना आर्थिक स्थिरता व सुरक्षितता देण्यासाठी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील…
महा धुरळा
कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती कोल्हापूर, दि. २५ : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या…
राज्यातील सहकारी पतसंस्थांना आर्थिक स्थिरता व नियामक मंडळाच्या नियमावलीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून नियामक मंडळ सक्षमीकरण करणार
राज्यातील सहकारी पतसंस्थांना आर्थिक स्थिरता व नियामक मंडळाच्या नियमावलीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून नियामक मंडळ सक्षमीकरण करणार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती मुंबई, दि. २५ : राज्यातील सहकारी पतसंस्थांना आर्थिक…
तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली मुंबई, दि. २६: ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य…
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया मराठेशाहीचा अभ्यासक हरपला!!! मराठेशाहीचा देदीप्यमान इतिहास पुराव्यांसह जगासमोर मांडणारे उत्तुंग व्यक्तिमत्व, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ इतिहास…
जनसुराज्य शक्ति पक्षाच्या कोल्हापूर महानगर पालिका उमेदवार संवाद मेळावा आज पार पडला.
जनसुराज्य शक्ति पक्षाच्या कोल्हापूर महानगर पालिका उमेदवार संवाद मेळावा आज पार पडला. पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देश उमेदवाराने आपले मत मांडलेत त्याला उद्देशून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री संमितदादा कदम यानी…
राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशीच आहे. ही तुटपुंजी…
महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे-बनावट खतांचा सुळसुळाट; कारवाई व नुकसानभरपाईची खासदार धनंजय महाडिक यांची मागणी
महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार महाडिक यांनी शेतकर्यांशी संबंधीत एका महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि बनावट खतांची विक्री होत असल्यामुळे, शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब दोषी व्यापार्यांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात बोलताना, आज खासदार धनंजय महाडिक यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या एका महत्वाच्या विषयाकडे देशाचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची आणि खतांची विक्री होत असून, त्यातून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. बनावट आणि बोगस बियाण्यांमुळे पिकांची उगवण कमी होत असून, उत्पादनात मोठी घट होत आहे. त्यातून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. शिवाय बनावट खतांचा मुद्दाही खासदार महाडिक यांनी उपस्थित केला. अशा खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून, पिकांवरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. शेतकरी मोठ्या आशेने बियाणे आणि खत खरेदी करतो, पण जर तेच निकृष्ट निघाले तर त्याला प्रचंड आर्थिक फटका बसतो. सरकारने बोगस बियाणे किंवा खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. बियाणे आणि खतांच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करावी, बाधित शेतकर्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, शासकीय तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकर्यांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे खासदार महाडिक यांनी संसदेत स्पष्ट केले. ज्या पध्दतीने तंबाखूविरोधी जाहिराती प्रसारीत केल्या जातात, त्याच पध्दतीने बनावट बियाणे आणि खतांविरोधातही शासनाने जनजागृती मोहीम सुरू करावी, अशी त्यांनी मागणी केली. शेतकर्यांच्या एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाला खासदार महाडिक यांनी वाचा फोडली असून, आता सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहीले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) जाहीर; अर्ज प्रक्रिया 27 मार्चपासून
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) जाहीर; अर्ज प्रक्रिया 27 मार्चपासून कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 चे…
जिल्ह्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनाकडून आवश्यक निर्बंध
जिल्ह्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनाकडून आवश्यक निर्बंध नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन कोल्हापूर, दि. 25 :…