*आजरेकर फाउंडेशन मार्फत कोल्हापुरातील महाराष्ट्र राज्य 19 वर्षा खालील फुटबॉल संघामध्ये निवड झालेल्या सहा खेळाडूंचे सत्कार* .
जम्मू-कश्मीर येथे होणार्य 19 वर्षा खालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धे साठी *महाराष्ट्र राज्य संघात कु. मुस्तफा फरास , कु.स्मित पार्टे , कु.प्रतीक गायकवाड, कु. विराज पाटील, कु.मयूर सुतार, कु.अविराज पाटील, या महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज संघाचे खेळाडूंचे निवड
झाल्याबदंल सत्कार करण्यात आला. या सर्व खेळाडूना क्रीडा शिक्षक प्रदीप साळुंखे याचे मार्गदर्शन लाभले.या सत्कार समारंभ प्रसंगी *उद्योगपती तेज घाटगे,उद्योगपती समर जाधव, स्वप्निल पार्टे, सुलतान फरास (काका),राजू भाई नदाफ ,अशपाक आजरेकर* आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू *आश्किन आजरेकर* यांच्या वतीने खेळाडूंना सन्मानचिन्ह व ट्रॅक सूट देऊन सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.