*बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमालेचे आयोजन*
कोल्हापूर : कोल्हापुर लिंगायत समाज संस्था, बसव केंद्र कोल्हापुर आणि राणी चन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त दि. २६, २७ व २८ एप्रिल २०२५ रोजी तीन दिवसीय ‘बसव व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प शनिवार दि.२६ एप्रिल २०२५ रोजी शरण साहित्याचे अभ्यासक श्री. चन्नवीर भद्रेश्वरमठ, सोलापूर हे गुंफणार असून त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘धुळिमांकाळ ते शिवयोगी सिध्दरामेश्वर : वैचारिक उत्थानाचा आलेख’ असा आहे. या दिवशी डॉ.अरुण शिंदे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे हे द्वितीय पुष्प गुंफणार असून ते ‘शरणांची पर्यावरणीय प्रज्ञा’ या विषयावर मांडणी करणार आहेत. त्यावेळी शरण साहित्य अध्यासनाच्या समन्वयक प्रा.डॉ.तृप्ती करेकट्टी अध्यक्ष असतील. व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी दि. २८ एप्रिल २०२५ रोजी जेष्ठ विचारवंत डॉ. नागोजीराव कुंभार, लातुर यांचे ‘विचारवंत आणि समाज’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर अध्यक्ष असतील. ही तीन दिवसीय व्याख्यानमाला रोज संध्याकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथील मिनी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी या व्याख्यानमालेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सरला पाटील, राजशेखर तंबाके, विलास आंबोळे, बाबुराव तारळी, सुभाष महाजन, विजयकुमार पाटील, सुरेश जांबुरे, ज्ञानेश्वर गवळी, चंद्रशेखर बटकडली यांनी केले आहे.