जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीची गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण.

Spread the news

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीची गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण .

­

 

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी दिले पत्र .

  •  

कोल्हापूर दि . 24
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सदस्यांचा गट नोंदणी करण्याची प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली .
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांच्याकडे सदरची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली .
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे ,यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते श्री तानाजीराव पाटील यांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली .
यावेळी भाजपाचे ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील , ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .
तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजश्री लक्ष्मण गावडे (अडकूर) सुयशा अमरीशसिंह घाटगे (सिद्धनेली ) शिवानी विजयसिंह भोसले (चिखली) काकासो मारुती सावळकर ( म्हाकवे )नामदेव दिनकर वाइंगडे (उचगाव ) वनीता सागर भोगम (कळंबे तर्फ ठाणे ), सलीम अब्बास महात ( शिरोली पुलाची )महेश बसगोंडा पाटील (पट्टणकोडोली ) कुमार मारुती कांबळे (कबनूर) सानिका राहुल आवाडे (कोरोची ) प्रशांत लक्ष्मण शहापुरे (आलास ) हे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते .
जिल्हा परिषदेचे भाजपाचे गटनेते तानाजी पाटील यांनी गट नोंदणीची कागदपत्रे यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केली .तर उपजिल्हाधिकारी डॉ . संपत खिलारी यांनी कागदपत्रांची पडताळणी केली .


Spread the news

You may also like

error: Content is protected !!