भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूरचे एन आय आर एफ इंडिया रँकिंग २०२५ मध्ये दैदिप्यमान यश “:
*“देशात ७८ वे तर राज्यात १० वे स्थान”*
‘ गतीमान शिक्षणातुन समाज परिवर्तन’ हे बीद्र वाक्य उराशी बाळगुन १० मे १९६४ रोजी स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या व वाढत्या गरजा तसेच दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हे लक्षात घेवून त्या त्या भागात नविन शाखा सुरू करण्याचे धोरण भारती विद्यापीठाने स्विकारले.कोल्हापूर व आसपासच्या भागातील फार्मसी पदवीचे शिक्षण घेवू इच्छिणा-या विद्यार्थीची गरज ओळखून मा. डॉ. पतंगराव कदमयांच्या कुशल मार्गदर्शना खाली भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी ची स्थापना सन १९९६ मध्ये झाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे व उपप्राचार्य डॉ एम एस भाटिया यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीतच महाविद्यालयाने शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे. महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाचे निरंतर संलग्निकरण मिळालेले आहे. तसेच *’नॅशनल असेसमेंट अॅन्ड अॅक्रीडेशन कौन्सील’ नॅकचे ए प्लस तसेच शिक्षण मंत्रालय भारत सरकार मार्फत जाहीर केलेल्या “नॅशनल इन्स्टिट्युशनल रैंकिग फेमवर्क ” (एनआयआरएफ) २०२५ क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरने राष्ट्रीय स्तरावर ७८ वे स्थान पटकावले, एन आय आर एफ क्रमवारीत सलग दहा वेळा* स्थान व एन बी.ए. अक्रिडेशन तीन वेळा मिळालेले शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. महाविद्यालयाची नोंदणी विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी च्या १२(बी) व २(एफ)या यादीत समाविष्ट झाल्याने आजपर्यंत महाविद्यालयास दोन कोटी रूपयाचा संशोधन निधी मिळालेला आहे. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे मान्यता प्राप्त पीएच. डी संशोधन केंद्र आहे. आतापर्यंत महाविद्यालयातील प्राध्यापकांचे एकुण ११५६ हुन अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमधुन प्रसिध्द झाले आहेत व ९४ हुन अधिक पेंटट प्रसिध्द झालेले आहेत. शिवाजी विद्यापीठाने उत्तम निकालाची परंपरा, नेटका दर्जा व गुणवत्ता आदि बाबी लक्षात घेऊन महाविद्यालयाचा २००५ पासुन २०२३ पर्यंत सलग आठ वेळा *अग्रणी महविद्यालय* म्हणुन दर्जा दिला आहे. महाविद्यालयात उच्च विद्याविभूषीत अनुभवी शिक्षकवर्ग,प्रशस्त इमारत, सुसज्य ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, खेळांसाठी प्रशस्त किडांगण व सुसज्य सांस्कृतीक सभागृह आहे.महाविद्यालयात ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल विभाग गेली २० वर्षे कार्यरत असून विभागामार्फत भारतातील नावाजलेल्या औषध कंपन्यांना कॅम्पस इंटरव्युहसाठी निमंत्रीत करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदावर नोकरी मिळवण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या
जातात. महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या सातत्यपुर्ण कामामुळे बी फार्मसी, एम. फार्मसी आणि डी. फार्मसी विद्यार्थ्यांची १०० टक्के प्लेसमेंट करण्यात यशस्वी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी एन. एस. एसच्या माध्यामातून स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीरे, लेक वाचवा अभियान, वृक्षारोपण, दत्त्तक खेडे योजना असे विविध उपक्रम राबविले जातात.
महाविद्यालयाचे निर्फ इंडिया रैंकिंग २०२५ चे समन्वयक प्राध्यापक उदयकुमार पाटील, सर्व शिक्षक, आजी माजी विद्यार्थी व स्टेक होल्डर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे प्राचार्य डॉ एच एन मोरे यांनी सांगितले.
या दैदिप्यमान यशा बदल माजी मंत्री व भारती विद्यापीठचे कार्यवाह मा.डॉ. विश्वजित कदम, कुलपती, डॉ शिवाजीराव कदम, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला कदम, हेल्थ सायन्सेसच्या संचालिका डॉ अस्मिता जगताप यांनी शाखेचे अभिनंदन केले.