बिळुर पंचायत समिती उमेदवारीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना साकडे — महायुतीतून बिळुर जागा जनसुराज्यला देण्याची मागणी!
जत प्रतिनिधी :
सांगली जिल्ह्यातील महायुतीच्या प्रत्येक मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारा जनसुराज्य शक्ती पक्ष सतत भाजपसोबत ठामपणे उभा आहे. विशेषतः जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम हे वेळोवेळी भाजपला सांगली जिल्ह्यात मदत करत असल्याने जत तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वेगाने वाढत आहे.
येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीसोबत राहणार असून, बिळुर पंचायत समिती ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
या गणातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील हे उमेदवार म्हणून इच्छुक असून, कोणत्याही परिस्थितीत बिळुरची जागा जनसुराज्यलाच मिळावी म्हणून समितदादा कदम यांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी सांगितले.




