भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची फेरनिवड

Spread the news

भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची फेरनिवड

कोल्हापूर

भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. जाधव हे गेले 30 वर्षे पक्षात सक्रिय असून अनेक पदावर त्यांनी काम केले आहे.

  •  

दोन वर्षांपूर्वी जाधव यांची महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी अतिशय चांगले काम केले. याशिवाय संघटनात्मक बांधणीतही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. पक्षाचे विविध उपक्रम यशस्वी राबवत त्यांनी शहरात पक्षाचा विस्तार वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलला.

गेल्या महिन्यात दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्षांची निवड झाली होती. पण, महानगर जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे उत्सुकता वाढली होती.अखेर आज जाधव यांचीच फेर निवड झाल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले.

….

आपण पक्षाचे अनेक वर्षे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहोत. गेल्या दोन वर्षात अध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी करण्याची संधी मिळाली त्यामुळेच पक्षांना पक्षाने आपल्याला पुन्हा नियुक्त करत आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

विजय जाधव जिल्हाध्यक्ष, भाजप


Spread the news

You may also like

error: Content is protected !!