कोरे अभियांत्रिकीत “डिजिटल फाऊंड्री: कार्यशाळेची उत्साहात सांगता*

Spread the news

*कोरे अभियांत्रिकीत “डिजिटल फाऊंड्री: कार्यशाळेची उत्साहात सांगता*

फोटो ओळी:*व्यासपीठावर उपस्थित वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मयुरा ग्रुप चे कार्यकारी संचालक मा. रवी डोल्ली यांचा सत्कार करताना, सोबत अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्र. प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एम. एस. धुत्तरगाव.*

वारणानगर – येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल विभाग आणि एआयसीटीइ (वाणी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “डिजिटल फाऊंड्री: आयओटी, रोबोटिक्स व ऑटोमेशन यांचे एकत्रीकरण” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे, अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी हि नावीन्यपूर्ण कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्व संयोजकांचे अभिनंदन केले. आणि हि कार्यशाळा एआयसीटीई ने प्रायोजित केली त्याबद्दल धन्यवाद दिले. तसेच विद्यार्थ्यांनी औद्यागिक वसाहती फिरण्यासाठी वेळ काढून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहनही यावेळी केले. मयुरा ग्रुप चे कार्यकारी संचालक मा. रवी डोल्ली यांनी कामगारांना बदलून त्याठिकाणी ऍटोमेशन वापरले जावे, अशा क्रांतीची अजून आपल्या येथे गरज नाही तर जेथे मानवी सुरक्षितता गरजेची आहे तेथे हे तंत्रज्ञान वापरले जावे असे या वेळी बोलताना सांगितले.
या कार्यशाळेत मा. चंद्रशेखर डोल्ली (अध्यक्ष, मयुरा स्टील्स प्रा. लि., कोल्हापूर), मा. मंगेश पाटील (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मौर्या इंडस्ट्रीज प्रा. लि., कोल्हापूर), मा. आदित्य पाटील (संचालक, घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि., कोल्हापूर), मा. राहुल पाटील (अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमन, कोल्हापूर विभाग), डॉ. एस. एस. मोहिते व डॉ. एस. एस. ओहोळ (सीओईपी, पुणे), मा. मोईन सिद्दीकी (सीमेन्स डिजिटल इंडस्ट्रीज सॉफ्टवेअर, पुणे), प्रा. शैलेश शिरगुप्पीकर (आर. आय. टी., सांगली), मा. सी. पी. महाजन (सीईओ, डॉल्फिन लॅब. पुणे) या सारख्या देशातील नामवंत उद्योगपती, संशोधक आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एम. एस. धुत्तरगाव, सहसमन्वयक डॉ. एस. व्ही. लिंगराजू आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून दीडशेहून अधिक विद्यार्थी, उद्योजक आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णकुमार जोशी यांनी केले, आभार कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मुकुंद धुत्तरगाव यांनी मानले.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!