*मुख्यमंत्री यांचे गावातच कंत्राटदारची धक्कादायक आत्महत्या*
महाराष्ट्र राज्य तंत्रालयात महासंघटना आक्रमक आंदोलनाच्या पावित्र्यात
कोल्हापूर
राज्य सरकारने तब्बल एक लाख कोटी रुपयांची बिले कंत्राटदारांची थकीत ठेवली आहेत यामुळे कंत्राटदार अस्वस्थ असून त्यातीलच नागपूर येथील प्रेमवच्छा वर्मा. साई कन्स्ट्रक्शन या कंत्राटदराने आत्महत्या केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३८ कोटींची देयके प्रलंबित आहेत यामुळे त्यांनी नागपुर येथे आत्महत्या केली आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आह
सदर शासनाच्या याच कंत्राटदार यांची देयके न देण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या एक वर्षापासून आंदोलन करीत आहेत. यापुर्वीच बरोबर एक महिन्यापूर्वी जलजीवन मिशन चे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी पण आत्महत्या केली होती . शासनाच्या या असल्या दिवाळखोरी कारभार बाबत आता गणपती विसर्जन झाले बरोबर एक राज्यस्तरीय बैठक पुणे येथे आयोजित करून या सर्व विषयाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ , राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यासह इतर संघटनांनी घेतला आहे*