*काँग्रेसच्या आवाहनाला साथ… मदतीसाठी जमले दातृत्वाचे हजारो हात*
*कोल्हापूर :* विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार कोल्हापूरकरांचा दातृत्वाचा हात सुरूच आहे. काहींनी तर, शैक्षणिक साहित्याची मदत देखील याठिकाणी आणून दिली आहे. तर काहींनी ऑन लाईन जीवनावश्यक वस्तूं याठिकाणी पोहच केल्या आहेत. अगदी हातावरचे पोट असणाऱ्या लोकांनी देखील आपल्या परीने पूरग्रस्तांच्या साठी मदत दिली आहे.
कुणी धान्य देतंय, तर कोण रोजच्या वापरातील वस्तू, तर कोणी साबणाचे किट, कपडे अन् शैक्षणिक साहित्य. अशा स्वरूपात मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या करिता मदत सुरूच आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करुया हा मदतीचा संकल्प काँग्रेसने केला. त्यानुसार पूरग्रस्तांच्याकरिता मदत संकलित करण्यात येत असून, आज चौथ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच होता. आज दिवसभरात अनेकांनी जीवनावश्यक वस्तू, आणि साहित्य पूरग्रस्तांच्या करिता जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये जमा केले. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी, त्यांच्या रोजच्या खाऊच्या पैशातून देखील याठिकाणी मदत दिली. ज्याचे हातावरचे पोट आहे अशांच्याही हातांनी दातृत्वाची जागा घेतल्याने महापुराच्या संकटात सापडलेल्या मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठवाड्याला आपणच सावरूया’ म्हणत कोल्हापूर जिल्ह्यात मदतीची एक लोकचळवळ गावागावांत सुरू झाली आहे. जो-तो आपापल्या परीने यात खारीचा वाटा उचलत असल्याने महापूरग्रस्तांसाठी काँग्रेस कमिटी मध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची आणि रोजच्या वापरातील वस्तूंची मदत गोळा झाली आहे.
पूरग्रस्तांना देण्यासाठी अन्नधान्याचे किट काँग्रेस कमिटीत आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत चंदगडपासून शाहूवाडी, गगनबावडा अशा दुर्गम भागातून आलेले लोक काँग्रेस कमिटीत येऊन आपली मदत देत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाची पोस्ट सोशल मीडियावर पाहिल्यानंतर काहींनी तर पुणे, धुळे आणि राजस्थान येथुन ऑन लाईन पद्धतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली आहे. महापुरामध्ये मुलांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. काही घरांमधील शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वरुपात या ठिकाणी मदत जमा झाली आहे. पुरामुळे सर्व काही होत्याचं नव्हतं झालं आहे. घरातील प्रापंचिक साहित्य देखील पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहे. त्यामुळे,
काहींनी तर, कपडे आणि ब्लॅंकेट्स देखील या ठिकाणी मदत स्वरूपात आणून दिलेत. तर काहींनी जीवनावश्यक वस्तूंचे किट आणून दिले आहेत.
माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी, 24 सप्टेंबर पासून मदत संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे. आता पर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 1500 हून अधिक किट जमा झाल्याचे सांगीतले. त्यामध्ये तांदूळ, साखर, गहू, आटा मसुरडाळ, तूरडाळ, मुगडाळ, चहा पावडर, चटणी, मीठ मसाले आणि खाद्यतेलाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तर 4 हजार किलो हून अधिक तांदूळ, 2 हजार किलो हुन अधिक गहू, साबुदाणा,.साखर, चटणी, तूरडाळ, बिस्किट, पाण्याच्या बॉटल अशा वस्तू देखील जमा झाल्या आहेत.
दरम्यान, पूरग्रस्तांच्या साठी जीवनावश्यक वस्तूंची ही मदत सुरूच असून ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा लोकांच्याकडून देखील, दातृत्व शील भावनेने मदत दिली जात आहे.
ही मदत येत्या २९ सप्टेंबरला महापूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रविवारी 28 सप्टेंबर हा मदत जमा करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, प्रताप जाधव सरकार, मधुकर रामाणे, शशिकांत खोत, बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने, कैलास गोडदाब, सुभाष बुचडे, महेश जाधव, धीरज पाटील, नारायण गाडगीळ, संग्राम पाटील, संजय पोवार – वाईकर, विद्यानंद पोळ, आदी उपस्थित होती.