महाराष्ट्रातील कंत्राटदार सोमवार दि ६ एप्रिल २०२६ पासून राज्यातील सर्व विभागाकडील विकासाची कामे बंद करणार.. इंजि मिलिंद.

Spread the news

महाराष्ट्रातील कंत्राटदार सोमवार दि ६ एप्रिल २०२६ पासून राज्यातील सर्व विभागाकडील विकासाची कामे बंद करणार.. इंजि मिलिंद.

­

 

कोल्हापूर, प्रतिनिधी
९ मार्च
२०२६ रोजी कर्जत येथे ३५ जिल्ह्यातील राज्यस्तरीय कंत्राटदार यांचे प्रचंड मोठे संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाचा एकमताने निर्णय.

  •  

आज कर्जत येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण संघटना तसेच ३५ जिल्हा मधील बहुसंख्येने उपस्थित सर्व विभागाकडील कंत्राटदार यांची ७७६०० कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत E टेंडर प्रक्रिया मध्ये प्रचंड आर्थिक घोटाळा, सगळीच मंजूर केलेली ( एकतर १४ महिन्यांपासून कामेच करीत नाही) कामे लोकप्रतिनिधी च्या दबावाखाली प्रशासनाने बळजबरीने मॅनेज करणे यामध्ये प्रचंड मोठा आर्थिक लाभ घेणे,,छोटे छोटे कंत्राटदार व त्यांच्या व्यावसायास उद्योजकांचा दर्जा देऊन यांना तातडीने वित्तीय संस्था यांचे कमी दराने कर्ज उपलब्ध करणे, शासकीय कामांत दंड आकारणे, मुदतवाढ यासारखे अनेक जाचक अटी रद्द करणे या सर्व मागण्या बाबत मा मुख्यमंत्री व संबंधित प्रशासनाने बैठक घेतली नाही वा मार्ग काढला नाही काढला तर राज्यातील सर्व विभागाकडील विकासाची कामे कंत्राटदार सोमवार ६ एप्रिल पासून बेमुदत बंद करण्याचा एकमुखाने संमत करण्यात आला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, सुनील नांगराने,बापु लाड,संजय मैंद, सुरेश कडु पाटील सह ३५ जिल्हा पदाधिकारी यांनी दिली आहे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!