भ्रष्ट मार्गाने परवाने देणे बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन : कोल्हापूर नेक्स्ट चा इशारा*

Spread the news

*भ्रष्ट मार्गाने परवाने देणे बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन : कोल्हापूर नेक्स्ट चा इशारा*

 

 

  •  

कोल्हापूर: काही एजंट व अधिकारी संगनमताने पैसे घेवून विना चाचणी परवाना देत असल्याचे कोल्हापूर नेक्स्ट च्या लक्षात आले. ही अत्यंत गंभीर बाब असून अशा पद्धतीने पैसे घेवून विनाचाचणी परवाने देणे बंद करावे आणि चाचणी मार्गावर त्वरीत CCTV बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कोल्हापूर नेक्स्ट च्या शिष्ट मंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना दिला.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील, वाहन चालकांना परवाना देण्याचा प्रकारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे कोल्हापूर नेक्स्टला समजले. त्यानंतर माजी नगरसेवक प्रदीप उलपे व कार्यकर्त्यांनी सातत्याने काही दिवस चाचणी मार्गावर लक्ष ठेवले असता खरोखरीच अशा प्रकारे परवाने दिले जात असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनियमित, तसेच एजन्ट आणि अधिकारी यांच्या संगनमताने होणाऱ्या कारभार बाबत अनेक तक्रारी कोल्हापूर नेक्स्ट कडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे या कार्यालयाकडून वाहन चालवण्याची चाचणी न घेता चालकाला देण्यात येणारा परवाना. सदर बाब अत्यंत गंभीर असून हे समाज विघातक कृत्य आहे असे प्रदीप उलपे यांनी सांगितले तर अजित ठाणेकर यांनी ही बनवेगिरी करण्यासाठीच आपल्या कार्यालयाकडून चाचणी मार्गावर सी सी टीव्ही यंत्रणा लावण्यात आली नाही का ? अशी विचारणी केली. सदर कृत्य हे अपघातांना चालना देणारे आहे. अपघातात कोण आपले अवयव गमावतो तर कोण आपला जीव गमावतात असे चंद्रकांत घाटगे म्हणाले. एजंन्ट आणि अधिकारी मिलीभगत करून वेवेगळ्या पद्धतीने भ्रष्ट कृत्ये करत आहेत ती तात्काळ न थांबवल्यास कोल्हापूर नेक्स्ट च्या वतीने तीव्र आंदोलन करू अशा इशारा विजयसिंह खाडे पाटील यांनी दिला. तसेच चाचणी मार्गावर तातडीने सी सी टीव्ही बसवावेत अशीही मागणी शिष्ट मंडळाने केली.
या शिष्टमंडळामध्ये अमोल पाटील, यशवंत माने, अमित टिकले, अभिजित पाटील, अजित भुगुलकर, अभिजीत कुलकर्णी आदी सह कार्यकर्ते सहभागी होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!