शिवाजी विद्यापीठ व परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक भरती मधील भ्रष्ट कारभार व भोगस गिरी रोखण्या साठी युवासेनेची हेल्पलाईन आजपासून सुरु

Spread the news

शिवाजी विद्यापीठ व परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक भरती मधील भ्रष्ट कारभार व भोगस गिरी रोखण्या साठी युवासेनेची हेल्पलाईन आजपासून सुरु

­

 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आपल्या शिवाजी विद्यापीठ व परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती चालू झाले आहे. ही गोष्ट जरी चांगली असली तरी काही भ्रष्ट प्रवृत्ती यामध्ये हस्तक्षेप करत असून सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आर्थिक व्यवहार करत असल्याचे युवा सेनेच्या दर्शनास काही सुज्ञ उमेदवारांनी आणून दिले आहे याआधी देखील काही महाविद्यालयांमध्ये जेव्हा चुकीच्या पद्धतीने प्राध्यापक भरती सुरू होते यावेळी युवासेनेने आवाज उठवला होता व निवड होणाऱ्या उमेदवारांची नावे मुलाखतीच्या एक दिवस आधीच सुद्धा जाहीर केली होती. यापुढे देखील युवा सेना आपला दणका अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे. आपण वरील प्रश्न लक्ष घालून शिवाजी विद्यापीठ व अन्य महाविद्यालयात होणाऱ्या भरती पारदर्शक पद्धतीने व आर्थिक व्यवहारातुन होऊ नये यासाठी प्रयत्न करावा व ज्या महाविद्यालयात असे आमच्या, किंवा आपल्या निदर्शनात दिसून येईल तेथील भरती तात्काळ स्थगित करावी . याबरोबर या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार थांबवण्यासाठी युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजपासून आपली हेल्पलाइन सुरू करत आहे, हेल्पलाइनच्या माध्यमातून, आम्ही नवतरुण उमेदवार विध्यार्थी बांधवांना आवाहन करत आहे की आपल्या कडे कोण नोकरीला लावतो मला पैसे द्या असे कोण आढळून आल्यास आम्हाला संपर्क करा, तसेच विविध स्टिंग ऑपरेशन राबवून आर्थिक व्यवहारातून ज्या महाविद्यालयात भरती होईल तेथील भरती युवा सेना स्टाईलने उधळून लावेल. याची आपण नोंद घ्यावी व भरती पारदर्शक होण्यासाठी आपल्या विद्यापीठ स्तरावर जास्तीत जास्त प्रयत्न करावे त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ साठी होणाऱ्या प्राध्यापक भरतीची अर्ज भरण्याची तारीख 10 एप्रिल वाढवुन मिळावी जेणेकरून अनेक उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळेल व आपल्या विद्यापीठात चांगले व दर्जेदार प्राध्यापक मिळतील..
अश्या मागणीचे निवेदन आज कुलगुरू गोसावी यांना देऊन युवासेनेने येणाऱ्या काळातील भ्रष्टाचार वं भोगासगिरी रोखण्यासाठी मा. कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पलाईन सुरु केली, यावर कुलगुरू यांनी आम्ही देखील यावर सतर्क आहे, आणि असे कोण आपणास आढळून आल्यास आम्हाला संपर्क करा, आम्ही त्याच्यावर कारवाई करू असे
सांगितले..

  •  

युवासेनेच्या हेल्पलाईन चे नंबर पुढीलप्रमाणे..8308645252,9921993292,9552378983,9049088678,

यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, चैतन्य देशपांडे, युवतीसेनेच्या कृष्णा जाधव,सुमित मेळवंकी,रोहीत वेढे, अक्षय घाटगे, श्रीनंद वडार, कनिष्क शिंदे, शुभम पाटील, संकेत गुरव,आदित्य हुलजी,अभि दबडे,ऋषिकेश जोशी,विनय क्षीरसागर,अक्षय मोरे,जयवंत वडगावंकर,अयान सय्यद, सानिका दामूगडे, आदित्य हुलजी, मानस कांबळे,आदी


Spread the news

You may also like

error: Content is protected !!