*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये*
*टिनिटसग्रस्त रुग्णांसाठी बुधवारी शिबीर*
कानात सतत शिट्टी वाजणे, घंटीसारखा आवाज ऐकू येणे किंवा कोणताही बाह्य आवाज नसताना वेगवेगळ्या ध्वनींचा अनुभव येणे ही समस्या ‘टिनिटस’ म्हणून ओळखली जाते. ही समस्या सामान्य वाटली तरी अनेकदा ती व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम करणारी ठरते. अशा रुग्णांसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बुधवार दि. 6 ऑगस्ट रोजी कान, नाक आणि घसा विभागातर्फे टिनिटसविषयी मार्गदर्शन व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
टिनिटस हा कानातील पेशीना झालेल्या नुकसानामुळे होतो. याशिवाय वय, लिंग, जीवनशैली, तीव्र आजाराच्या संपर्कात येणे आदी करणामुळे तसेच जास्त वेळ मध्यम आवाजात गाणी ऐकल्याने किंवा रेडीओ पाहिल्याने टिनिटस होऊ शकतो. यावर वेळीच उपचार न केल्यास व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. रुग्णाची श्रवणशक्ती, झोप यामध्येही समस्या जाणवतात.
टिनिटससाठी निश्चित उपचार नाही. मात्र योग्य मार्गदर्शन आणि उपचारपद्धतीमुळे आराम मिळू शकतो. श्रवणशक्ती कमी असलेल्या लोकाना श्रवणयंत्र वापरल्याने फरक पडू शकतो. काही रुग्णामध्ये साउंड जनरेटर, मास्कर्स वापरले जातात. टिनिटसच्या या समस्येबाबत सविस्तर मार्गदर्शन, तपासणी आणि उपचार यासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत होणाऱ्या या शिबिरामध्ये टिनिटसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेता येणार असून, टिनिटसची कारणे, निदान व त्यावरील उपचारपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डी. वाय. पाटील हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.