दमसाच्या ३६ व्या साहित्य संमेलनात गडहिंग्लजला भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
आज ग्रंथदिंडीने प्रारंभ, उद्या उद्घाटन
कोल्हापूर, ता. ११: दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि शिवराज विद्या संकुल, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने ३६व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे शुक्रवार १२ डिसेंबर २०२५,शनिवार दि.१३डिसेंबर २०२५ आणि रविवार दि. १४डिसेंबर २०२५ रोजीआयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ होणार असून शनिवारी उद्घाटन समारंभ होईल.
या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्रा.अविनाश सप्रे असून उद्घाटक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस आहेत. तर स्वागताध्यक्ष : प्रा. किसनराव कुराडे आहेत. संमेलनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आहे.
शुक्रवार दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०. ०० वा. ग्रंथदिंडीचे आयोजन केलेले आहे.शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५* सकाळी १०. ०० उद्घाटन होणार आहे. यामध्ये विशेष सत्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अच्युत माने यांचा करण्यात येणार आहे. यावेळी योगिता माळी यांच्या स्मरणार्थ अनुबंध प्रतिष्ठान यांच्यातर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
*दु. २. ०० वा ख्यातनाम साहित्यिक आसाराम लोमटे यांची मुलाखत विजय चोरमारे, नामदेव माळी हे घेणार आहेत.
दु. ३. ०० वा. कविसंमेलन होणार असून याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी आणि समीक्षक रफीक सूरज आहेत.
यामध्ये किरण भावसार, सचिन शिंदे, विलास गावडे, धनाजी घोरपडे, धर्मवीर पाटील, संकेत म्हात्रे, सुभाष कोरे, गोपाळ गावडे,शिवाजी शिंदे, चंद्रशेखर कांबळे,अशोक अलगुंडी, नीलेश शेळके, महेश कराडकर, अभिजीत पाटील, रावसाहेब मुरगी, मधुकर जांभळे,उर्मिला शहा,संजय कांबळे, अनिल कलगुटकी,संभाजी जगताप, प्रणिता शिपुरकर, संजय थोरात, निर्मला शेवाळे यांचा सहभाग आहे. सूत्रसंचालन :डॉ.चंद्रकांत पोतदार हे करणार आहेत.
*सायं:५. ३० वा. कवितेचे जेव्हा गाणे होते : या कार्यक्रमाचे सादरीकरण जेष्ठ कवी अरुण म्हात्रे करणार आहेत.
रविवार दि. १४ डिसेंबर २०२५ सकाळी १०. ०० वा. आजच्या काळात लेखकांच्या पुढील आव्हाने! या विषयावर परिसंवाद होणार आहे.या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत असून यामध्ये प्राचार्य डॉ. दत्ता पाटील,संपत देसाई, राजा माळगी, बाळासाहेब पाटील यांचा सहभाग आहे.
* सकाळी ११. ३० वा.लेखक -विद्यार्थी संवाद होणार आहे.
याचे अध्यक्ष: स्वाती शिंदे-पवार असून यामध्ये मनोहर भोसले, दयासागर बन्ने यांचा सहभाग आहे.
*दु.२. ०० वा. निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून याचे अध्यक्ष :संजीवनी तडेगावकर आहेत. यामध्ये सुरेश शिंदे,हनुमंत चांदगुडे,भरत दौंडकर,आबा पाटील, रमजान मुल्ला
यांचा सहभाग आहे.दु. ४. ०० वा.कथाकथन होणार असून याचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार अप्पासाहेब खोत आहेत. यामध्ये
हिंमत पाटील,जयवंत आवटे, सुभाष खोत यांचा सहभाग आहे.
या संमेलनाची जोरदार तयारी सुरू असल्याचे संयोजकांनी कळवलेले आहे.



