उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राहुल पाटील व राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश* *मंत्री हसन मुश्रीफ यांनी सडोली खालसा येथे भेट देऊन केली सभास्थळाची पाहणी*

Spread the news

*उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राहुल पाटील व राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश*

*मंत्री हसन मुश्रीफ यांनी सडोली खालसा येथे भेट देऊन केली सभास्थळाची पाहणी*

*सडोली खालसा, दि. २४:*
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील या बंधूसह दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांचा आज सोमवार दि. २५ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत आहे. सडोली खालसा ता. करवीर येथे हा भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सडोली खालसा येथे भेट देऊन सभास्थळाची व कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.

यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राहुल पाटील व राजेश पाटील या बंधूसह दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशामुळे संबंध कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाची ताकद वाढलेली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

  •  

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, शिवाजीराव कारंडे, केरबा भाऊ पाटील, ए डी चौगुले, मारुतीराव जाधव, पांडुरंग पाटील, सुनील खराडे, संदीप पाटील – कुर्डूकर, बी एच पाटील, गोकुळचे माजी संचालक पी डी धुंदरे, गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील, श्रीपतराव दादा सहकारी बँक, निवृत्ती सहकारी खरेदी विक्री संघ, राजीवजी गांधी सुतगिरण या संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………

*सडोली खालसा: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी गावाला भेट देऊन सभास्थळाची पाहणी व कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी राहुल पाटील, राजेश पाटील, युवराज पाटील, बाळासाहेब खाडे आदी प्रमुख.*
=======


Spread the news

You may also like

error: Content is protected !!