**देसाई -मोरे व मोहिते विवाह सोहळा संपन्न **
कोल्हापूर दि.4 शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई यांचे नातू व चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी अजितराव मोरे व पेट्रन सदस्य दौलत देसाई यांचे भाचे आणि माजी परिवहन समिती सभापती कोल्हापूर महानगरपालिका श्री. अजित जयसिंगराव मोरे यांचे सुपुत्र चिरंजीव पृथ्वी आणि श्री अजितसिंह जयवंतराव मोहिते संचालक, शेतकरी संघ कोल्हापूर यांची सुकन्या चि. सौ. का. ऋतुजा यांचा शुभविवाह सोहळा महासैनिक दरबार हॉल प्रांगणातील शाही मंडपामध्ये संपन्न झाला.
वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी मा.खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, मा. आ. मालोजीराजे छत्रपती, मा. मधुरिमाराजे छत्रपती, पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, मा. खा. निवेदिता माने, मा. खा. संजय मंडलिक , मा.आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार अमल महाडिक मा. आ.राजुबाबा आवळे. मा.आ. सुजित मिणचेकर, उद्योगपती रामदास काकडे, मा.व्ही बी.पाटील, मा. राजेश लाटकर, मा.राहुल पाटील, मा.गुलाबराव पोळ , मा.आर. के. पोवार , ॲड.अनिकेत निकम, मा. चेतन नरके, मा. विश्वास नारायण पाटील, मा.भैया माने, मा.युवराज पाटील,कुलगुरू डॉ. डी .टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील , कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, दैनिक सकाळचे सरव्यवस्थापक श्री.यतीन शहा, संपादक निखिल पंडितराव, बी न्यूजचे संपादक श्री. चारुदत्त जोशी, श्री. विजय देवणे, श्री. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, श्री.दादा लाड, आदिल फरास, जुना राजवाडा पोलिस निरीक्षक श्री.संजीव झाडे,शाहूपुरी पोलिस निरीक्षक डोकेसाहेब,तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. युवा नेते दौलत देसाई, अजितराव मोरे, मा.वर्धन देसाई, प्रणव देसाई, वीरेंद्र देसाई , वीरसेन मोहिते , अजितसिंह मोहिते, सुजितसिंह मोहिते ,सुरज मोरे, कमलाकर मोरे यांनी मान्यवर पाहुण्याचे स्वागत केले.
या विवाह सोहळ्यास दौलत देसाई मित्र परिवार व हनुमान उद्योग समूहाचे पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी -माजी नगरसेवक ,तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पत्रकार , इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी , अबालवृंद व जिल्ह्यातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.